ऐका पाहू ट्रॅव्हिसच्या लग्नाची गोष्ट

वर्षभरापूर्वी एकमेकांशी मैत्रीसंबंध असणारे ट्रॅव्हिस आणि कोर्टनी एकमेकांच्या प्रेमात पडले कसे?
MARRIAGE STORY OF TRAVIS BARKER AND KOUTNEY KARDASHIAN
MARRIAGE STORY OF TRAVIS BARKER AND KOUTNEY KARDASHIANesakal

अमेरिकेतील एका प्रसिद्ध ड्रमर ची हि गोष्ट.नाव त्याचे ट्रॅव्हिस बार्कर. कोट्यवधी फॅन फोलोविंग असणाऱ्या या व्यक्तीच्या लग्नाची गोष्ट ही अनोखीच .वर्षभरापूर्वी एकमेकांशी मैत्रीसंबंध असणारे ट्रॅव्हिस आणि कोर्टनी एकमेकांच्या प्रेमात कसे पडले हे त्यांनाही कळले नाही.अनेक मुलाखतींमध्ये बोलताना त्यांनी त्यांच्या या नात्याचे सत्य उघड करताना ' आम्हाला आमच्याकडे बघून कधी कधी हसायला येतं' असे म्हटले आहे. रॉक बँड ब्लिंक- १८२ साठी ओळखल्या जाणाऱ्या ट्रॅव्हिसची गणना जगातल्या पहिल्या शंभर ड्रमर्सपैकी एकात करण्यात येते.तर कोर्टनी ही पब्लिक फिगर म्हणून कायम चर्चेत असते.

२०१९ मध्ये कोर्टनी आणि ट्रॅव्हिस मॅलिबूमधील एका उपहारगृहात सोबत गेले असता सर्वत्र चर्चेत आलेत. त्यानंतर त्यांच्यात प्रेमसंबंध असल्याचे सर्वत्र पसरले होते. मात्र 'कोर्टनी मी माझी चांगली मैत्रीण असून मला तिच्यासोबत आणि तिच्या कुटुंबासोबत वेळ घालवायला आवडतो' असे ट्रॅव्हिस म्हणाला होता.मात्र दोन वर्षांनी या दोघांनी त्याचे मैत्रीतून प्रेमात रूपांतर झाल्याचे उघड केले.

MARRIAGE STORY OF TRAVIS BARKER AND KOUTNEY KARDASHIAN
Shivlaxmi & Sanjay Valentine Special Lovestory : ते म्हणतात ना 'स्वीकारता आलं की साकारता येत..!

पुढे या जोडप्याचा ऑक्टोबर २०२१ ला साखरपुडा झाल्यानंतर त्यांच्या लग्नाबाबतीच्या अनेक बातम्या चर्चेत होत्या.याबाबतिचे सत्य उघड करत कोर्टनीने "प्रॅक्टिस मेक्स परफेक्ट"असे लिहत आम्ही लगणाचे चे दृश्य कसे असावे ते अनुभवण्याचा प्रयत्न करत होतो असे सांगितले होते. खरं तर या जोडप्याला उशिरापर्यंत लग्नाचा परवाना न मिळाल्याने यांचे कायदेशीररित्या लग्न होऊ शकले नाही.

बिलबोर्डला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत, ट्रॅव्हिसने (Travis Barker)कोर्टनीसोबतच्या त्याच्या संबंधांबद्दल स्पष्टपणे सांगत लग्नाला उशीर कसा झाला आणि त्याचे कारण काय होते ते सांगितले.कोर्टनीने ट्रॅव्हिसच्या आयुष्याला कसे नवीन वळण दिले तेही त्याने बिलबोर्डने घेतल्या मुलाखतीत सांगितले. .(hollywood) प्राणघातक विमान अपघातातून वाचल्यानंतर उडण्याच्या त्याच्या भीतीवर मात करण्याबद्दल आणि कोर्टनीने त्याला ते करण्यास कशी मदत केली याबद्दलही सांगितले.१३ वर्षांनंतर प्रथमच विमानातून प्रवास केल्यानंतर, ट्रॅव्हिसने इन्स्टाग्रामवर कोर्टनीबद्दल "तुझ्यासोबत काहीही शक्य"असे म्हटले होते.

कार्दशियनसोबतच्या त्याच्या नातेसंबंधाबद्दल मुलाखतींमध्ये क्वचितच बोलणारा ट्रॅव्हिस तिच्याबद्दल खूप प्रेमाने बोलला आणि तो आता त्याच्या कामाला आणि वैयक्तिक आयुष्याला अधिक चांगल्या प्रकारे कसे प्राधान्य देत आहे हे देखील त्याने सांगितले, "मला वाटते की मी माझ्या वेळेचा उपयोग कसा करावा हे शिकत आहे,(Drummer)मला जिथे सोयीस्कर वाटेल तिथे पुरेसं काम करण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यामुळेही मला अनेक दिवसांच्या सुट्ट्या मिळाल्यासारखे वाटत आहे, ज्या मी गेल्या वर्षभरात कधीही घेतल्या नाही.

MARRIAGE STORY OF TRAVIS BARKER AND KOUTNEY KARDASHIAN
शेतकऱ्याचा मुलगा थेट Hollywood मध्ये, वाचा स्वप्नीलची यशस्वी कहाणी

कौर्टनी कार्दशियन अलीकडेच जिमी किमेलच्या टॉक शोमध्ये कुटुंबाच्या नवीन आगामी शोची जाहिरात करण्यासाठी दिसली,जिथे तिने तिच्या लग्नाबद्दल सांगितले आणि उघड केले की त्यांना खरोखर लग्न करायचे होते परंतु लग्नाचा परवाना सर्व काही बंद असल्याने मिळू शकला नाही.लवकरच त्यांच्या लग्नाची बातमी पुढे येणयाची शक्यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com