esakal | क्रिकेटमधल्या 'दादा'च्या आयुष्यावर बायोपिक, लव फिल्म्सची घोषणा
sakal

बोलून बातमी शोधा

क्रिकेटमधल्या 'दादा'च्या आयुष्यावर बायोपिक, लव फिल्म्सची घोषणा

क्रिकेटमधल्या 'दादा'च्या आयुष्यावर बायोपिक, लव फिल्म्सची घोषणा

sakal_logo
By
युगंधर ताजणे

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली (sourav ganguly) अर्थात दादा (dada) हा जसा जगप्रसिद्ध फलंदाज म्हणून प्रसिद्ध होता तसा तो भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणूनही ओळखला गेला. त्याच्या नावावर अनेक विक्रम आहे. तो एक लोकप्रिय खेळाडू आहे. सध्या तो बीसीसीआयचा अध्यक्ष आहे. अशा लोकप्रिय दादाच्या आयुष्यावर बायोपिकची निर्मिती केली जाणार आहे. त्याची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. अनेकांनी सोशल मीडियावरुन दादाच्या या बायोपिकसाठी शुभेच्छाही दिल्या आहेत. गेल्या काही वर्षांपासून बॉलीवू़डमध्ये भारतीय क्रिकेटपटूंच्या आय़ुष्यावर बायोपिक प्रसिद्ध झाले आहेत. मात्र त्यात बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक यशस्वी झालेला चित्रपट हा महेंद्रसिंग धोनीच्या आयुष्यावरील होता. त्यात धोनीची भूमिका बॉलीवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतनं केली होती.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरच्या आयुष्यावरही चित्रपटाची निर्मिती करण्यात आली होती. त्या चित्रपटासाठी ऑस्कर विजेत्या ए आर रहमाननं संगीत दिलं होतं. मात्र बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट प्रेक्षकांच्या फारसा पसंतीस पडला नसल्याचे दिसून आले आहे. यावर्षी भारताचे माजी वेगवान गोलंदाज आणि ज्यांच्या कर्णधारपदाच्या कारकीर्दीत भारतानं पहिला विश्वकरंडक जिंकला अशा कपिल देव यांच्या आयुष्य़ावरही 83 नावाचा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यात कपिल देव यांची भूमिका बॉलीवूडचा स्टार अभिनेता रणवीर सिंगनं केली आहे.

सौरव गांगुली यांच्या आयुष्यावरील बायोपिकची घोषणा लव फिल्म्सच्या वतीनं करण्यात आली आहे. क्रिकेट चाहत्यांच्या मनात दादाविषयी एक आदराची भावना आहे. त्याच्याबद्दल प्रेमही आहे. आजही त्याच्या अनेक इंग्निजच्या आठवणी क्रिकेट चाहत्यांच्या मनात ताज्या आहेत. केवळ आक्रमक फलंदाज म्हणून नव्हे तर एक कल्पक आणि निर्भिड कर्णधार म्हणून गांगुली चाहत्यांना परिचित आहे. 90च्या दशकातील क्रिकेटर ते सध्याच्या भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाचे अध्यक्ष होण्यापर्यंत, गांगुली यांना आंतरराष्ट्रीय रेकॉर्ड्ससोबत त्यांचा अनेक विवादास्पद भूमिकेसाठी देखील तितकेच ओळखले जाते. त्यांचे जीवन भारतीय क्रिकेटमधील सर्वात रोमहर्षक प्रवास आहे. तो आता मोठ्या पडद्यावर पाहणं प्रेक्षकांना आगळी वेगळी पर्वणी ठरणार आहे.

हेही वाचा: सौरव गांगुलीच्या बायोपिकमध्ये रणबीर साकारणार मुख्य भूमिका?

हेही वाचा: सौरव 'दादा' राजकारणात एन्ट्री करणार ? बंगालच्या राज्यपालांशी केली एक तास चर्चा

या बायोपिकची निर्मिती लव रंजन आणि अंकुर गर्ग करणार आहेत. लव फिल्म्सने 'सोनू के टीटू की स्वीटी', 'दे दे प्यार दे', 'मलंग' आणि 'छलांग' सारख्या यशस्वी चित्रपटांची निर्मिती केली असून त्यांच्या आगामी चित्रपटांमध्ये रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर अभिनीत लव रंजन यांच्या दिग्दर्शनात बनणारी 'कुत्ते' आणि 'उफ्फ' यांचा समावेश आहे. मात्र या चित्रपटामध्ये सौरव गांगुलीची भूमिका कोण करणार याबाबत कोणताही खुलासा निर्मात्यांकडून करण्यात आलेला नाही.

loading image
go to top