पालथ्या घड्यावर पाणीच!! 'लव सोनिया' या चित्रपटाला सेन्साॅरने सुचवले 45 कट्स

टीम ई सकाळ
मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

लव्ह सोनिया या हिंदी चित्रपटाला प्रसून जोशी यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या सीबीएफसी अर्थात सेंट्रल बोर्ड फाॅर फिल्म सर्टिफिकेशनने तब्बल 45 कट्स सुचवले आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन तबरेज नूरानी यांनी केले असून या चित्रपटात सई ताम्हणकर, किरण खोजे या मराठी कलाकारांनीही काम केले आहे. 

मुंबई : लव्ह सोनिया या हिंदी चित्रपटाला प्रसून जोशी यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या सीबीएफसी अर्थात सेंट्रल बोर्ड फाॅर फिल्म सर्टिफिकेशनने तब्बल 45 कट्स सुचवले आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन तबरेज नूरानी यांनी केले असून या चित्रपटात सई ताम्हणकर, किरण खोजे या मराठी कलाकारांनीही काम केले आहे. 

पहलाज निहलानी यांना डच्चू दिल्यानंतर केंद्र सरकारने अध्यक्षपदी गीतकार प्रसून जोशी यांना आणून बसवले. जोशी हे गीतकार असल्यामुळे चित्रपटांचे विषय ते संवेदनशीलतेने हाताळतील अशी अपेक्षा संपूर्ण भारतीयांना होती. पण बहुधा हा सर्व प्रकार फोल ठरणार असे दिसत असून लव्ह सोनिया हे त्याचे उदाहरण मानावे लागेल. हा चित्रपट आंतरराष्ट्रीय स्तरावर चालणाऱ्या मानवी तस्करीवर बोलतो. भाष्य करतो. यापूर्वी अनेक आंतरराष्ट्रीय महोत्सवांमधून या चित्रपटाने वाहवा मिळवली आहे. 2018 मध्ये हा चित्रपट भारतात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात मनोज वाजपेयी, राजकुमार राव, फ्रिदा पिंटो, डेमी मूर यांच्यासारखे कलाकार आहेत. 

नुकताच हा चित्रपट सेन्साॅरच्या अधिकाऱ्यांना दाखवण्यात आला.त्यावेळी चित्रपटात हिंदी आणि इंग्रजी भाषेत असलेली शिवीगाळ वगळण्याची सूचना सेन्साॅरने दिली आहे. तसंच काही दृश्य काढून टाकण्याचीही सूचना करण्यात आली आहे. आता निर्माते त्यांचा हा सल्ला एेकतात की रिवाईजल कमिटीपुढे आपलं म्हणणं मांडतात, ते पाहाणं औत्सुक्याचं ठरेल. 

Web Title: love sonia cbfc orders 45 cuts esakal news