Udaipur Murder:'मारेकऱ्यांना मुस्लिम सजा द्या,इस्लामच्या नावावर...'-लकी अली Lucky Ali | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Lucky Ali speaks On Udaipur Murder Case

Udaipur Murder:'मारेकऱ्यांना मुस्लिम सजा द्या,इस्लामच्या नावावर...'-लकी अली

उदयपुरमध्ये(Udaipur) एक साधा-सरळ टेलर असलेला कन्हैय्यालालची निर्घृणपणे हत्या(Murder) करण्यात आली अन् त्या घटनेनं देशाला हादरवून सोडलं. नुपुर शर्माचं समर्थन केल्याप्रकरणी कन्हैय्यालालला दोन तरुणांनी मृत्यूच्या दरीत ढकललं ज्यानं सगळेच स्तब्ध झाले आहेत. बॉलीवूड आणि टी.व्ही सेलिब्रिटींनी या प्रकरणावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. कन्हैय्यालालच्या हत्येनं सगळेच शॉक झाले आहेत.(Lucky Ali speaks On Udaipur Murder Case)

हेही वाचा: 'ड्रग्ज आणि बॉलीवूड...' सुनिल शेट्टी स्पष्टच बोलला

लकी,अली,कंगना रनौत,गौहर खान,रणवीर शौरी,अनुपम खेर,देवोलिना भट्टाचार्जी,स्वरा भास्कर या सर्वांनी यावर संताप व्यक्त करणाऱ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. धर्माच्या नावावर ज्या पद्धतीनं कन्हैय्यालालची हत्या केली गेली त्याचा सगळ्यांनीच निषेध केला आहे. गायक लकी अलीन(Lucky Ali) कन्हैय्यालालला योग्य न्याय मिळावा अशी मागणी केली आहे. त्यानं आपल्या फेसबूक पोस्टमध्ये लिहिलं आहे- ''एका व्यक्तीची हत्या म्हणजे पू्र्ण मानवजातीची हत्या केल्यासारखं आहे. कृपया त्यांना मुस्लीम कायद्यानं शिक्षा द्या. इस्लामच्या नावावर त्यांनी जो गुन्हा केला आहे अगदी तशीच कठोर शिक्षा त्यांना मिळायला हवी''.

Lucky Ali Post On Udaipur Murder. Justice for Knhaiyalal

Lucky Ali Post On Udaipur Murder. Justice for Knhaiyalal

काय आहे उदयपुर हत्याकांड प्रकरण?

राजस्थानमधील उदयपूरमध्ये(Udaipur) कन्हैय्यालाल या टेलरची दिवसा उजेडी गळा चिरुन हत्या करण्यात आली. कारण होतं भाजप नेत्या नुपूर शर्मा(Nupur Sharma) यांच्या पैगंबरांविरोधातील वक्तव्याला पाठिंबा देणं. आता खरंतर काही दिवसांपूर्वी कन्हैय्यालालने स्पष्ट केलं होतं की,''मला मोबाईल नीट वापरता येत नाही. मला व्हॉट्स अॅपवर नुपुर शर्मांची वादग्रस्त पोस्ट आली होती,ती चुकून माझ्या मुलाकडून व्हॉट्स अॅप स्टेटसवर पोस्ट झाली. मला मोबाईल नीट वापरता येत नसल्यामुळे ती काही काळ तशीच राहिली. पण त्यानंतर मला जीवे मारण्याच्या धमक्या मिळू लागल्या''.

हेही वाचा: 'ही तर लेडी इम्रान हाश्मी', KRK च्या ट्वीटने 'त्या' अभिनेत्रीचे चाहते भडकले

''१५ जूनपासून मला या धमक्या मिळतायत असं मृत्यूपूर्वी कन्हैय्यालाल म्हणाला होता. ११ जूनला त्या व्हॉट्सअप स्टेटसच्या पोस्टसाठी कन्हैय्यालाल विरोधात तक्रार नोंदवली गेली होती. पैगंबर मोहम्मद यांच्या विरोधातील वादग्रस्त वक्तव्याचा प्रचार केल्याचा त्याच्यावर आरोप ठेवण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली . पण त्यानंतर कन्हैय्यालालची जामिनावर सुटका झाली होती. १५ जूनला कन्हैय्यालालनं जीवे मारण्याची धमकी मिळत असल्याची तक्रार नोंदवली. त्यावेळी त्यानं पोलिसांना सांगितलं होतं की, त्याच्या विरोधात तक्रार नोंदवणारा त्याचा शेजारी नाजिम आहे,ज्याला माहित होतं की मला मोबाईल चालवता येत नाही''.

हेही वाचा: Udaipur Murder: 'हिंदूंनो जागे व्हा...',पोंक्षेंची पोस्ट Viral

त्यावेळी कन्हैय्यालालनं पोलिसांना सांगितलं होतं की,''नाजिमनं त्याच्या समाजाच्या दबावाखाली येऊन ती तक्रार नोंदवली होती. काही दिवसांपासून नाजिम आणि त्याच्या सोबतीनं पाच जणं माझ्या दुकानासमोर फेऱ्या मारत आहेत ही कल्पना देखील कन्हैय्यालालनं पोलिसांना दिली होती. माझ्या फोटोला त्यांच्या समाजात व्हायरल केलं गेलंय आणि मला पाहताच जिवंत मारा असं देखील ते लोक सांगत सुटले आहेत असं देखील कन्हैय्यालाल म्हणाला होता''. आणि तो जे बोलला होता तेच घडलं,२८ जून रोजी दुपारी ३.३० च्या सुमारास दिवसाउजेडी सर्वांसमक्ष कन्हैय्यालालची गळा चिरुन हत्या करण्यात आली.

Web Title: Lucky Ali Speaks On Udaipur Murder

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..