
शत्रुघ्न सिन्हांवरील Sex Scam आरोपावर मुलगा लव सिन्हाचा मोठा खुलासा
शत्रुघ्न सिन्हा(Shatrughan Sinha) आणि त्यांच्या कुटुंबाच्या विरोधात अभिनेत्री पूजा मिश्रानं (Pooja Mishra)सेक्स स्कॅमचा(Sex Scam) खळबळजनक आरोप काही दिवसांपूर्वी केला होता. यावर लव सिन्हानं पलटवार करताना म्हटलं आहे की पूजा मिश्राचं मानसिक संतुलन ठीक नाही. शत्रुघ्न सिन्हांचा मुलगा लव सिन्हानं(Luv Sinha) ट्वीटरवर पूजा मिश्राच्या धक्कादायक आरोपांवर रोखठोख प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा: ओटीटी वर RRR आणि KGF 2 एकामागून एक धडकणार; जाणून घ्या प्रदर्शनाच्या तारखा
बिग बॉस 5 ची लोकप्रिय स्पर्धक राहिलेली पूजा मिश्रा एकदा पून्हा चर्चेत आली आहे. आता तिनं शत्रुघ्न सिन्हा आणि त्यांची पत्नी पूनम सिन्हा यांच्यावर खळबळजनक आरोप केले आहेत. तिनं एका मुलाखतीत म्हटलं होतं की,''शत्रुघ्न आणि त्यांच्या पत्नीनं मिळून त्यांच्या घरी एक अश्लील स्कॅम सुरु केलं होतं. आणि यात आपल्याला फसवलं गेलं अन् आपलं करिअर खराब झाल्याचं पूजा मिश्रा म्हणाली होती. इतकंच नाही तर शत्रुघ्न आणि पुनम सिन्हा यांनी आपल्यावर ब्लॅक मॅजिक केल्याचं देखील पूजा म्हणाली होती''.
पूजा मिश्रानं आरोप केला आहे की,सोनाक्षी सिन्हा देखील या स्कॅममध्ये तिच्या आई-वडिलांसोबत सहभागी होती. आणि यामुळेच ती लोकप्रिय झाली आहे. आता यावर लव सिन्हानं प्रतिक्रिया देताना ट्वीटरवर म्हटलं आहे की,''अशा जमवून आणलेल्या कथेवर कोण विश्वास ठेवेल. या अशा गोष्टींवर केस केली जाऊ शकते,जे केवळ खोटं नाही तर खूप वाईट पद्धतीनं बोललं गेलं आहे''.
हेही वाचा: The Kashmir Files नवा वाद, विवेक अग्निहोत्रींची थेट केंद्राकडे तक्रार
तर दुसऱ्या एका ट्वीटमध्ये लव सिन्हानं लिहिलं आहे की,''त्या महिलेला करिअरमध्ये मदत करण्याची गरज आहे. तिचं करिअर संपलंय. आणि म्हणूनच तिचं मानसिक संतूलन बिघडल्यानं माझ्या कुटुंबावर ती आरोप करत आहे. मी अशा आरोपांवर प्रतिक्रिया देतच नाही खरंतर. पूजा मिश्रावर याआधी देखील खूप गंभीर आरोप लागले आहेत''.
Web Title: Luv Sinha Tweet Against Model Puja
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..