एक मशीन एक माणूस 

संकलन : चिन्मयी खरे  
बुधवार, 29 मार्च 2017

अब्बास-मस्तान या जोडीने अनेक मोठ्यामोठ्या स्टार्सना नाव मिळवून दिलंय. आतापर्यंत बॉलीवूडमध्ये बाजीगरपासून खिलाडीपर्यंत त्याचे सगळे चित्रपट हिट झाले आहेत. रेस, रेस 2, ऐतराज, अजनबी, हमराज यांसारखे चित्रपटही तेवढेच यशस्वी झाले आहेत, पण एवढे सुपरहिट चित्रपट देणाऱ्या जोडीचा मशीन हा चित्रपट खूपच फ्लॉप ठरला आहे. 25 कोटीचं बजेट असणारा हा चित्रपट आता पर्यंत फक्त दोन कोटीच कमाई करू शकला आहे. नुकताच मुंबईतील एका मल्टिप्लेक्‍समध्ये चित्रपट पाहण्यासाठी फक्त एकच प्रेक्षक आला होता. अशा 

परिस्थितीत त्या मल्टिप्लेक्‍समधील मशीन चित्रपटाचे सगळे शो रद्द करावे लागले. असं का झालं असेल बरं? सूत्रांच्या माहितीप्रमाणे या चित्रपटाच्या कथेत आणि क्‍लायमॅक्‍समध्ये 
काहीच दम नव्हता म्हणे! अब्बास मस्तानसारख्या चांगल्या दिग्दर्शकांनी यापुढे काळजी घेतलेली बरी. नाहीतर एवढं नुकसान कसं भरून निघायचं? 
 
Web Title: machine movie flop