Made In Heaven Season 2: 'किती वाट पाहिली! लग्नाच्या तयारीला येणार वेग

मेड इन हेवन या मालिकेच्या वेगळेपणामुळे नेटकऱ्यांमध्ये वेगळ्याच चर्चेला उधाण आले होते.
Made In Heaven season 2 Poster Viral social media
Made In Heaven season 2 Poster Viral social media esakal

Made In Heaven season 2 Poster : टीव्ही मनोरंजन विश्वामध्ये वेब मालिकांचा समावेश झाला आणि वेगळेच अर्थकारण सुरु झाले. आज भारतामध्ये चित्रपटांच्या तोडीस तोड प्रतिसाद हा वेबसीरिजला मिळाल्याचे दिसून आले आहे. सेक्रेड गेम्स पासून झालेली सुरुवात ही आता द नाईट मॅनेजर पर्यत आली आहे. त्याचा दुसरा सीझन प्रदर्शित झाला आहे. याशिवाय आणखी एका मालिकेनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

मेड इन हेवन या मालिकेच्या वेगळेपणामुळे नेटकऱ्यांमध्ये वेगळ्याच चर्चेला उधाण आले होते. काही बोल्ड सीनमुळे ही मालिका वादाच्या भोवऱ्यात देखील सापडली होती. मात्र दमदार कथानक आणि अभिनय यामुळे मालिकेला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. आता तब्बल चार वर्षांनी या मालिकेचा दुसरा सीझन हा प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. त्यामध्ये जिम सरभ, शोभिता धुलिपाला, अर्जून माथूर आणि कल्की केकला सारखे कलावंतांनी त्यामध्ये काम केले आहे.

Also Read - manipur violence : दोन महिन्यांपासून अशांत असलेलं मणिपूर हे नवं काश्मीर बनतंय का? या

मेड इन हेवन नावाच्या मालिकेला इमी पुरस्कारासाठी नामांकनही मिळाले होते. या मालिकेचा दुसरा सीझन हा अॅमेझॉन प्राईमवर प्रदर्शित होणार आहे. मेड इन हेवनच्या मेकर्सकडून नव्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले असून चाहत्यांनी यावरुन आनंद व्यक्त केला आहे. मालिकेच्या गोष्टीविषयी सांगायचे झाल्यास, दोन वेडिंग प्लॅनर्स तारा आणि करणनं आपआपल्या व्यवसायामध्ये दंग आहेत. ताराची भूमिका शोभिता आणि करणची भूमिका अर्जूननं साकारली आहे.

Made In Heaven season 2 Poster Viral social media
Puneet Superstar: पुनितसोबतचा पंगा Jio Cinemas ला पडला महागात, Bigg Boss Ott 2 मधुन बाहेर हाकलताच...

वेडिंग प्लॅनिंगसोबतच आपलं वैयक्तिक आयुष्य कसं संकटात सापडतं, आयुष्यातील चढउतार याविषयी या मालिकेच्या माध्यमातून भाष्य करण्यात आले आहे. एक्सेल मीडिया आणि एंटरटेनमेंट तसेच टायगर बेबी यांनी या मालिकेची निर्मीती केली आहे. मेड इन हेवन सीझन 2' लवकरच केवळ प्राइम व्हिडिओवर प्रीमियर होईल. गेल्या चार वर्षांपासून प्रेक्षक या मालिकेची वाट पाहत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com