Tik tok च्या मधुबालाचा इंटरनेटवर पुन्हा एकदा धुमाकुळ !

Madhubala of Tik tok
Madhubala of Tik tok

मुंबई : सोशल मीडिया हे असं माध्यम आहे ज्यामधून प्रसिद्धीही मिळते आणि एखादी व्यक्ती ट्रोलही होते. गाण्याचे व्हिडीओ आणि अॅक्टींगचं प्लॅटफॉर्म असलेल्या 'टिक टॉक' या अॅपने लोकांना वेड लावून सोडलं आहे. या अॅपमुळे कोणी आपली नोकरीच गमावली तर कोणी एका रात्रीत 'स्टार' ही झालं आहे. सध्या इंटरनेटवर चर्चा आहे ती टिक टॉक करणाऱ्या एका मुलीची. प्रियांका कंडवाल नावाच्या या मुलीने इंटरनेटवर धुमाकुळ घातला आहे. नक्की काय आहे कारण जाणून घ्या ! 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

A post shared by Priyanka Kandwal (@priyankakandwal) on

मनमोहक सौंदर्याने प्रेक्षकांच्या मनावर राज करणारी आणि नाजुक अदांनी लाखो चाहत्यांना घायाळ करणारी बॉलिवूडमधील राणी म्हणजे 'मधुबाला'. प्रियांका ही टिक टॉक करणारी युजर अगदी मधुबालासारखीच दिसते. ती टिक टॉकवर मधुबालाच्या गाण्यांवर व्हिडीओ करते आणि नेटकऱ्यांनी त्याला पसंती देत अक्षरश: डोक्यावर घेतलं आहे. एवढचं काय तर नेटकऱ्यांनी तिला 'टिक टॉकची मधुबाला' असं नावही दिलं आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#aaiyemeharban

A post shared by Priyanka Kandwal (@priyankakandwal) on

नेटकऱ्यांचं लक्ष वेधत पुन्हा एकदा प्रियांका चर्चेत आली आहे कारण, मधुबालाच्या एका सुप्रसिद्ध गाण्याचा टिक टॉक व्हिडीओ तिने अपलोड केला आहे. त्या प्रसिद्ध गाण्याचं नाव 'आइए मेहरबां' असं आहे. यामध्ये प्रियांका हुबेहुब मधुबालासारखी दिसत आहे. एवढचं नाही तर तिचे हावभाव, लुक आणि अभिनय हा मधुबालासारखाच आहे. प्रियांकाचं हे वैशिष्ट्य आहे की, ती मधुबालाच्या प्रत्येक गाण्यामध्ये तिच्यासारख्या लुकमध्ये दिसते, अनेकदा साडीमध्ये दिसते तर गाण्यातील हावभावदेखील मधुबालासारखेच असतात. तिचे बरेचसे व्हिडीओ हे ब्लॅक अॅण्ड व्हाइट कलरमधले आहेत. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Ye kya kar dala zalim #madhubalajiforever  #tiktok #tiktokindia

A post shared by Priyanka Kandwal (@priyankakandwal) on

प्रियांकाचे टिक टॉकवर सध्या साठ हजारांपेक्षा जास्त फोलोअरस् आहेत. ती इन्स्टाग्रामवरही मधुबालाच्या लुकमधले फोटो शेअर करते. प्रियांका टिव्हीवरील 'कुल्फी कुमार बाजेवाला' आणि 'माहिरा खान रिपोर्टिंग' या मालिकांमधून प्रेक्षकांसमोर आली आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Eid mubarak  #eidmubarak #eid

A post shared by Priyanka Kandwal (@priyankakandwal) on

याआधी बॉलिवूड कलाकारांसारखे दिसणारे अनेक जण समोर आले आहेत. ऐश्वर्या रॉय, कतरीना कैफ, विराट कोहली आणि अशा अनेक नावांचा यादीत समावेश आहे. पण, मधुबाला सारख्या दिसणाऱ्या प्रियांकाची गोष्टच निराळी आहे. एकदा तरी तिचे टिक टॉक व्हिडीओ पहाच ! 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com