

Bollywood Actress Madhuri: हिंदी चित्रपट विश्वातील सर्वात ओळखीचा आणि तितकाच लक्षवेधी चेहरा म्हणून जिच्याकडे पाहिले जाते त्या माधुरी दीक्षितची नेहमीच चर्चा होत असते. कधी तिच्या डान्सची, कधी तिच्या मराठी बोलण्याची, तर (Bollywood Actress news) कधी तिच्या कुटूंबातील व्यक्तींसोबत शेयर केलेल्या गंमतीशीर व्हिडिओची देखील. सध्या सोशल मीडियावर माधुरीचा एक व्हिडिओ (social media news) व्हायरल झाला आहे. त्यामध्ये तिचा लूक पाहून नेटकऱ्यांना मोठा धक्काच बसला आहे. त्यावरुन माधुरीला ट्रोल देखील करण्यात आले आहे.
बॉलीवूडमध्ये प्लॅस्टिक सर्जरी करणाऱ्या अभिनेत्रींची काही कमी नाही. विना प्लॅस्टिक सर्जरी त्या अभिनेत्री सुंदरच दिसत होत्या. मात्र त्यांनी केलेल्या सर्जरीनंतर त्यांचे दिसणे हे नेहमीच नेटकऱ्यांच्या चेष्टेचा विषय झाल्याचे दिसून आले आहे. यात प्रातिनिधीक उदाहरणे द्यायची झाल्यास दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी, रेखा, अनुष्का शर्मा, प्रियंका चोप्रा यांच्या नावाचा उल्लेख करावा लागेल. आता यासगळ्यात अभिनेत्री माधुरीचीही भर पडली आहे. माधुरीनं तीन दशकांहून अधिक काळ आपल्या अभिनयानं आणि नृत्यानं प्रेक्षकांच्या हदयाचा ठाव घेतला आहे.
आजही बॉलीवूडमधील सर्वोत्तम डान्सर कोण असं म्हटल तर माधुरीचे नाव समोर येते. त्या अभिनेत्रीनं चेहऱ्याची सर्जरी केली की काय असा प्रश्न नेटकऱ्यांनी उपस्थित केला आहे. सोशल मीडियावर विरल भयानीनं एक व्हिडिओ व्हायरल केला आहे. त्यात माधुरीचा वेगळाच लूक समोर आला आहे. यापूर्वी माधुरी अशी काही दिसत नव्हती. अशी शंका चाहत्यांनी बोलून दाखवली आहे. त्यामुळे माधुरीनं प्लॅस्टिक सर्जरी केली आहे. असे चाहत्यांना वाटत आहे.
एका युझर्सनं तर काय तो चेहरा, माधुरी तू खरं सांग, सर्जरी केली आहे की नाही...असा प्रश्न विचारुन आपला राग व्यक्त केला आहे. माधुरीचा तो लूक अनेक नेटकऱ्यांना आवडलेला नाही. त्यामुळे त्यांनी प्रतिक्रियेतून आपली नाराजी व्यक्त केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.