
Teachers Day : माधुरी, शाहरुखसह बाॅलीवूडकरांचे 'हे' आहेत खरे गुरु
Madhuri Dixit, Shahrukh Khan Bollywood Actors Real Gurus : आपल्या आयुष्यात गुरुचे स्थान वेगळे असते जो आपल्याला जगण्याचा खरा अर्थ शिकवतो, जो आपल्याला बुद्धीचे मोती देतो. काही तरी शिकण्यासाठी किंवा बनण्यासाठी, प्रत्येक माणसाच्या आयुष्यात कोणी ना कोणी गुरू असतात आणि बॉलीवूड एक अशी जागा आहे, जिथे स्टार्स त्यांचे अभिनय कौशल्य, गाणे, वादन, सर्व काही दाखवतात.
अभिनेता असो वा गायक त्यांचे काम ते अतिशय गंभीरपणे करतात. मात्र, हे सर्व करणे गुरूशिवाय होणे शक्य नाही. म्हणूनच बॉलीवूड स्टार्सही खऱ्या आयुष्यात कोणाला आपला गुरू मानतात ते आपण जाणून घेऊया...
बॉलिवूडचा किंग खान म्हटल्या जाणाऱ्या शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) अभिनयाचे सर्वांनाच वेड लागले आहे. त्याच्याबद्दल चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ आहे. शाहरुख चांगला विद्यार्थी असण्यासोबतच एक चांगला अभिनेताही आहे. शाहरुख खानने हंसराज महाविद्यालयामधून इकॉनॉमिक्स ऑनर्सची पदवी मिळवली आणि त्यावेळी त्याला अनिता नावाच्या शिक्षिकेने शिकवले होते. त्या अभिनेत्याबद्दल म्हणतात, की शाहरुख खान नेहमी वर्गात हातात हॉकी घेऊन यायचा, तो खेळासोबतच अभ्यासातही हुशार होता.
अभिनेत्री माधुरी दीक्षितच्या (Madhuri Dixit) अप्रतिम अभिनय कौशल्यासोबतच तिची अप्रतिम नृत्यकौशल्ये सर्वांनाच परिचित आहेत. जेव्हा ती पडद्यावर किंवा रंगमंचावर असते तेव्हा ती तिच्या नृत्याने आणि अप्रतिम अभिव्यक्तीने सर्वांची मने जिंकते. माधुरी दीक्षितने बिरजू महाराज यांच्याकडून शास्त्रीय नृत्याचे बारकावे शिकले आहेत. या शिवाय ती सरोज खानला तिचा गुरू मानते.
अभिनेता टायगर श्रॉफ त्याच्या अभिनयासोबतच अप्रतिम डान्सरपण आहे. टायगर त्याच्या यशाचे श्रेय त्याच्या गुरूंना देतो. तो दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदला आपला गुरू मानतो, तर हृतिक रोशन या अभिनेत्याला त्याचा ऑनस्क्रीन गुरू मानतो. (Bollywood Actors Real Gurus)