esakal | 'रामयुग'च्या निर्मात्यांवर भडकले 'शकुनी मामा'
sakal

बोलून बातमी शोधा

gufi paintal on ramyug

'रामयुग'च्या निर्मात्यांवर भडकले 'शकुनी मामा'

sakal_logo
By
स्वाती वेमूल

गेल्या वर्षी लॉकडाउनमध्ये ८०-९०च्या दशकातील मालिकांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. रामायण, महाभारत, श्रीकृष्ण यांसारख्या पौराणिक मालिका पुन्हा एकदा चर्चेत आल्या. टीआरपीच्या यादीत या मालिकांनी नव्याने आपलं स्थान निर्माण केलं होतं. यावर्षी लॉकडाउनमध्ये दिग्दर्शक कुणाल कोहलीने Kunal Kohli 'रामयुग' Ramyug ही नवी सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आणली. ६ मे रोजी ही सीरिज एमएक्स प्लेअरवर MX Player प्रदर्शित झाली. मात्र काहींना ही सीरिज अजिबात आवडली नाही. 'महाभारत' या मालिकेत शकुनी मामाची भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते गुफी पेंटल Gufi Paintal यांनी 'रामयुग' सीरिजवर टीका केली आहे. इतकंच नव्हे तर त्यांनी या सीरिजच्या निर्मात्यांनाही सुनावलं आहे. (mahabharat shakuni gufi paintal slams makers of ramyug )

गुफी पेंटल यांनी त्यांच्या युट्यूब चॅनेलवर व्हिडीओ पोस्ट करत 'रामयुग' सीरिजवर भाष्य केलं. "मी रामयुगची झलक पाहिली. नाविन्य आणण्यासाठी निर्माते इतकं टोकाला का जातात हे पाहून फार वाईट वाटलं. कलाकारांचे पोशाख नीट नाहीत, ना सेट चांगले आहेत. रामयुगमधून काहीतरी नवीन गोष्टी प्रेक्षकांच्या भेटीला येतील असं मला वाटलं होतं. श्रीराम, सीता, हनुमान आणि देव शंकर यांचं चित्र आधीपासूनच आपल्या डोक्यात स्पष्ट आहे. मग त्यांना का बदलावं? याआधीसुद्धा काहींनी त्यांना बदलण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांच्यावर फार टीका झाली होती. कृपया पौराणिक गोष्टींमध्ये काही बदल करू नका. त्यांना बदलणं म्हणजे लोकांच्या भावनांशी खेळणं. रामयुगमध्ये तर त्यांचा पोशाख इतका मॉडर्न केला आहे की ते बाहुबलीसारखे दिसत आहेत", अशा शब्दांत त्यांनी सुनावलं.

हेही वाचा: 'देवा, घडाळ्याचे काटे पुन्हा मागे फिरव'; वडिलांसाठी रितेश भावूक

निर्माते आणि कलाकारांनाही सुनावलं

"मला माहितीये की या सीरिजवर खूप पैसा खर्च केला आहे. मी सुद्धा निर्माता आहे. पण कोट्यवधी रुपये खर्च करण्याआधी थोडा अभ्यास तरी करा. लोकांच्या भावनांशी खेळू नका. प्रेक्षकांची मनं जिंकायची असेल तर पौराणिक मालिकेतील पोशाख बदलू नका, त्यांना अती मॉडर्न टच देऊ नका. त्याहून वाईट म्हणजे त्यात कोणताच कलाकार संवाद शांतपणे बोलत नाही. सर्वजण फक्त ओरडत आहेत. हा भक्तीचा शो आहे, यामध्ये श्रद्धा, भक्ती या गोष्टी असायला पाहिजेत", असं ते पुढे म्हणाले.

'रामयुग'बद्दल बोलताना गुफी यांनी रामानंद सागर यांच्या 'रामायण' या मालिकेचं उदाहरण दिलं. या मालिकेत श्रीरामाची भूमिका साकारणारे अभिनेते अरुण गोविल यांना आजही लोक देवासारखे मानतात, असं ते म्हणाले.