Mahaparinirvaan First Look : 'माणूस मेला की त्याची राख होते आपण....! ‘महापरिनिर्वाण’ चित्रपटाचा फर्स्ट लूक एकदा पाहाच

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या औचित्यानं मराठीतल्या एका वेगळ्या विषयावरील चित्रपटाचा फर्स्ट लूक समोर आला आहे.
Mahaparinirvaan First Look
Mahaparinirvaan First Lookesakal

Mahaparinirvaan First Look : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या औचित्यानं मराठीतल्या एका वेगळ्या विषयावरील चित्रपटाचा फर्स्ट लूक समोर आला आहे. महापरिनिर्वाण असे त्या चित्रपटाचे नाव आहे. त्या फर्स्ट लूकला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे.

६ डिसेंबर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने, 'महापरिनिर्वाण' चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. चित्रपटाच्या फर्स्ट लूकमध्ये बाबासाहेबांच्या अंतयात्रेतील लाखों लोकांची गर्दी दिसत आहे. "माणूस मेल्यावर त्याची राख होते, आपण राख विसर्जित करतो, पण मला त्या राखेच्या दिव्य आणि तेजस्वी कणातूनच इतिहास घडवायचाय." असे म्हणत अभिनेता प्रसाद ओक यांनी लक्ष वेधून घेतले आहे.

प्रसादनं या चित्रपटामध्ये नामदेवराव व्हटकर यांची भूमिका साकारली आहे. त्यांच्यासोबत अभिनेता गौरव मोरेही दिसत आहे. मात्र त्याची नेमकी भूमिका काय आहे, हे चित्रपट आल्यावरच कळेल. याव्यतिरिक्त या चित्रपटात डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका कोण साकारणार? हे सुद्धा अद्याप गुलदस्त्यात आहे.

भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीमध्ये उल्लेखनीय योगदान असलेला, दलितांच्या हक्कांसाठी लढलेला, समाजाच्या विविध क्षेत्रातील लोकांची जात, धर्माचा विचार न करता, सामाजिक न्याय आणि समतेसाठी लढणारा दूरदर्शी नेता आणि समाजसुधारक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निधनानंतर लाखों लोकांनी शोक व्यक्त केला होता.

'महापरिनिर्वाण' हा चित्रपट या ऐतिहासिक प्रसंगाचा समाजावर व त्या व्यक्तीच्या जीवनावर झालेल्या खोल परिणामांवर प्रकाश टाकणारा आहे. या चित्रपटाद्वारे प्रसाद ओक, गौरव मोरे, अंजली पाटील, कमलेश सावंत, दीपक करंजीकर, प्रफ्फुल सावंत , विजय निकम , हेमल इंगळे, कुणाल मेश्राम यासारखे नामवंत कलाकार प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

Mahaparinirvaan First Look
Ranbir Kapoor Animal Movie : 'अ‍ॅनिमल' मध्ये चमकला प्रसिद्ध मराठी अभिनेता, अजय- अतुलचंही होतंय कौतुक! काय आहे कारण

कल्याणी पिक्चर्स प्रस्तुत, कल्याणी पिक्चर्स व अभिता फिल्म प्रोडक्शन निर्मित 'महापरिनिर्वाण' या चित्रपटाचे दिग्दर्शन शैलेंद्र बागडे आहे आणि निर्माते सुनील शेळके तर सहनिर्माते आशिष ढोले आहेत. संगीतकार विजय गावंडे असून गुरु ठाकूर यांचे या चित्रपटाला गीत लाभले आहे. अमर कांबळे यांनी 'महापरिनिर्वाण'चे छायाचित्रीकरण केले आहे. तसेच या चित्रपटाचे वेशभूषाकार चंद्रकांत सोनावणे आणि कलादिग्दर्शक नितेश नांदगांवकर आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com