अभिनेत्री जया बच्चन यांच्या सुरक्षेत महाराष्ट्र सरकारने केली वाढ

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ
Wednesday, 16 September 2020

खासदार जया बच्चन यांच्या एका विधानाने संसेदत गदारोळ माजला होता. सोशल मिडियावर जया बच्चन यांना मोठ्या प्रमाणावर टिकेचा सामना करावा लागला. हा सगळा प्रकार पाहुन महाराष्ट्र सरकारने जया बच्चन  आणि त्यांच्या कुटुंबाची सुरक्षा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई- खासदार जया बच्चन यांच्या एका विधानाने संसेदत गदारोळ माजला होता. जया बच्चन यांनी रवि किशन यांच्यावर निशाणा साधत बॉलीवूडची प्रतिमा खराब करत असल्याचा आरोप केला होता. यानंतर कंगना रनौत रवि किशन आणि भाजपा समर्थकांनी जया बच्चन यांच्यावर टीका करायला सुरुवात केली. सोशल मिडियावरही जया बच्चन यांना मोठ्या प्रमाणावर टिकेचा सामना करावा लागला. हा सगळा प्रकार पाहुन महाराष्ट्र सरकारने जया बच्चन आणि त्यांच्या कुटुंबाची सुरक्षा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. 

हे ही वाचा: अभिनेता संजय दत्त पत्नी मान्यतासोबत खाजगी विमानाने दुबईला रवाना  

मुंबईमध्ये अमिताभ बच्चन यांचे दोन बंगले आहेत. जया बच्चन यांच्या विधानावर होत असलेला गदारोळ पाहता महाराष्ट्रातील उद्धव ठाकरेंच्या सरकारने या दोन्ही बंगल्याबाहेरील सुरक्षा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने ही सुरक्षा सोशल मिडियावर दिल्या जाणा-या धमक्यांमुळे वाढवली आहे. सरकारने हे देखील स्पष्ट केलं आहे की बच्चन कुटुंबाच्या वैयक्तिक सुरक्षेमध्ये कोणत्याही प्रकारची वाढ करण्यात आलेली नाही. 

महाराष्ट्र सरकारने बच्च कुटुंबाची सुरक्षा वाढवल्यानंतर भाजपाकडून तिखट प्रतिक्रिया आली आहे. भाजपाने म्हटलंय की, 'महाराष्ट्र सरकारने सुरक्षा वाढीची एवढी तत्परता सुशांत सिंह राजपूत आणि कंगना रनौत यांच्यासाठी का दाखवली नाही? त्यांनी पुढे म्हटलंय की सुशांतच्या कुटुंबाने फेब्रुवारीमध्ये मुंबई पोलिसांकडून सुशांतच्या जिवाला धोका आहे असं सांगितलं होते तेव्हा सरकारने कोणतीही सुरक्षा पुरवली नव्हती. भाजपाने म्हटलंय की हे कृत्य उद्धव ठाकरे सरकारचा दुट्टपीपणा दर्शवतं.'

maharashtra govt beefs up the security for the bachchan family


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maharashtra govt beefs up the security for the bachchan family