Maharashtra Shaheer: निव्वळ अभिमान! आता UK मध्येही वाजतंय महाराष्ट्र शाहीरचं गाणं..

परदेशातही 'बहरला हा मधुमास' ची भुरळ..
Maharashtra Shaheer baharala ha madhumaas song played on uk radio station ankush chaudhari kedar shinde
Maharashtra Shaheer baharala ha madhumaas song played on uk radio station ankush chaudhari kedar shindesakal

Maharashtra Shaheer movie song : महाराष्ट्र शाहिर सिनेमा प्रदर्शित होऊन आता महिना होत आला तरी या चित्रपटाची क्रेझ काही कमी होईना. अजूनही जिथे तिथे याच चित्रपटाची चर्चा आहे.

काही दिवसांपूर्वीच हा चित्रपट अमेरिकेत प्रदर्शित झाला होता, आता त्या पाठोपाठ आणखी एक आनंदाची बातमी समोर आली आहे.

अभिनेता अंकुश चौधरी याने ही गोड बातमी सर्वांना सोशल मिडियावर दिली आहे. महाराष्ट्र शाहीर या चित्रपटाचे गाणे भारतातच नाही तर जगभरात गाजत आहे. यासंदर्भातली ही पोस्ट पाहून सर्वांनी अभिमानाची भावना व्यक्त केली आहे.

(Maharashtra Shaheer baharala ha madhumaas song played on uk radio station ankush chaudhari kedar shinde)

Maharashtra Shaheer baharala ha madhumaas song played on uk radio station ankush chaudhari kedar shinde
Sharad Ponkshe: शिवाजी महाराजांनी स्वराज्य मिळवलं, कारण.. शरद पोंक्षेंचे मोठे विधान..

',महाराष्ट्र शाहीर' या चित्रपटातील सर्वाधिक गाजलेले गाणे म्हणे 'बहरला हा मधुमास नवा..'. या गाण्याने जवळपास सर्वाना वेड लावले. या गाण्यावर लाखों लोकांनी थीरकत रील शेयर केल्या.

हे गाणं सोशल मीडियावर खूप ट्रेंड झालं आणि अजूनही होत आहे. अनेक कलाकारही या गाण्यावर थिरकत आहेत. आता हे गाणं थेट परदेशातल्या रेडिओवर वाजत आहे.

याच संदर्भात अभिनेता अंकुश चौधरीने एक पोस्ट शेयर केली आहे. ''आपल्या मातीतल्या आपल्या मराठी गाण्याची भुरळ सातासमुद्रापार.. 'बहरला हा मधुमास..' हे गाणं UK मधील आघाडीच्या 'SABRAS RADIO' वर १५ व्या क्रमांकावर वाजू लागलंय!' अशी अभिमान वाटणारी बातमी त्याने शेयर केली आहे.

Maharashtra Shaheer baharala ha madhumaas song played on uk radio station ankush chaudhari kedar shinde
Vilasrao Deshmukh Birthday: निळू फुलेंचा 'तो' शब्द आणि विलासरावांनी महाराष्ट्र भूषण पुरस्काराची सूत्रच हलवली..

या आनंदाच्या बातमीने चाहते ही भारावले आहेत.अनेकांनी यावर कमेंट करत 'महाराष्ट्र शाहीर'च्या टीमचे कौतुक केले आहे.

केदार शिंदे दिग्दर्शित शाहीर साबळे यांचा जीवनपट उलगडणारा हा चित्रपट आता अवघ्या काही दिवसातच जोरदार लोकप्रिय झाला. महाराष्ट्राच्या मातीतील थोर लोकशाहीर स्वर्गीय कृष्णराव गणपतराव साबळे उर्फ शाहीर साबळे यांचा संपूर्ण जीवनप्रवास काही महत्वाचे प्रसंग या चित्रपटातून आपल्याला दिसणार आहेत.

या चित्रपटात 'अंकुश चौधरी' शाहीर साबळे यांच्या भूमिकेत आहे तर केदार शिंद यांची मुलगी 'सना शिंदे' ही शाहीर साबळे यांच्या पत्नीच्या म्हणजेच भानुमती साबळे यांच्या भूमिकेत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com