Maharashtra Shaheer: शाहीरांचं निरागस बालपण उलगडणारं 'गाऊ नको किसना', लहानग्या जयेश खरेचा कणखर आवाज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Maharashtra Shaheer, Maharashtra Shaheer news, gau nako kisna, baharla ha madhumas, ankush chaudhari, kedar shinde

Maharashtra Shaheer: शाहीरांचं निरागस बालपण उलगडणारं 'गाऊ नको किसना', लहानग्या जयेश खरेचा कणखर आवाज

Maharashtra Shaheer News: महाराष्ट्र शाहीर सिनेमाची सध्या सगळीकडे जोरदार चर्चा आहे. या सिनेमातलं यापूर्वी रिलीज झालेलं बहरला हा मधुमास (Baharla ha madhumas) हे गाणं सोशल मीडियावर खूप ट्रेंड झालं.

या सिनेमातलं दुसरं गाणं आज रिलीज झालंय. गाऊ नको किसना (Gau Nako Kisna) असं या गाण्याचं नाव असून काहीच वेळापूर्वी हे गाणं सोशल मीडियावर रिलीज झालंय.

(maharashtra shaheer new song gau nako kisna out now, viral boy jayesh khare voice)

गाऊ नको किसना हे नवीन गाणं यु ट्यूबवर रिलीज झालंय. या गाण्यात व्हायरल बॉय जयेश खरेचा आवाज ऐकायला मिळतोय. जयेश खरे हा तोच मुलगा आहे जो शाळेत चंद्रा गाणं गाऊन लोकप्रिय झाला होता.

त्याचा व्हिडिओ इंटरनेटवर प्रचंड व्हायरल झाला होता. शेवटी संगीतकार अजय - अतुल यांनी त्याचा आवाज हेरला आणि जयेशला महाराष्ट्र शाहीर मध्ये गाण्याची संधी मिळाली.

महाराष्ट्र शाहीर मधील गाऊ नको किसना या गाण्याचा व्हिडिओ भेटीला आलाय. यात शाहीर साबळे म्हणजेच छोटा किसना आईपासून लपत गाणं गातोय. जेव्हा त्याची आई समोर येते तेव्हा गावातले गावकरी त्याला 'गाऊ नको किसना' असं सांगत असतात.

शाहिरांचं निरागस बालपण या गाण्यातून उलगडलं आहे. 'आईचा धाक आणि गाण्याची हाक, भजन-कीर्तन, भारुडं, ओव्यांमध्ये रमणाऱ्या लहानग्या किसनाचं' हे गाणं अत्यंत श्रवणीय आहे.

केदार शिंदे अनेक वर्षांनी महाराष्ट्र शाहीर सिनेमाच्या माध्यमातून दिग्दर्शक म्हणून त्यांचा सिनेमा घेऊन येत आहेत. हा भव्य दिव्य सिनेमा असून अजय - अतुल यांनी सिनेमाच्या संगीताची धुरा सांभाळली आहे.

महाराष्ट्र शाहीर निमित्ताने अजय - अतुल आणि केदार शिंदे अनेक वर्षांनी एकत्र काम करत आहेत. सिनेमात शाहीर साबळेंची अनेक श्रवणीय गाणी प्रेक्षकांना ऐकायला मिळणार आहेत.

केदार शिंदे दिग्दर्शित महाराष्ट्र शाहीर सिनेमात अंकुश चौधरी शाहीर साबळेंच्या भूमिकेत झळकणार आहे. २८ एप्रिल २०२३ ला महाराष्ट्र शाहीर सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.