Dattu More: हास्यजत्रा फेम दत्तू मोरेला कशी पटली डॉक्टर बायको.. तेही पुण्यातली.. अशी आहे प्यारवाली लव्हस्टोरी

ती I LOVE YOU म्हणून मॅसेज डिलीट करायची.. हास्यजत्रा फेम दत्तू मोरेची खास लव्हस्टोरी..
maharashtrachi hasya atra fame actor dattu more love story with wife swati ghunage
maharashtrachi hasya atra fame actor dattu more love story with wife swati ghunagesakal

Dattu More Love Story: कलाकारांचं प्रेम, लग्न याविषयी कायमच सर्वांना उत्सुकता असते. काही दिवसांपूर्वीच 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता दत्तू मोरे विवाहबंधनात अडकला. यावेळी दत्तूने कोणताही गाजावाजा न करता लग्न केले.

जेव्हा त्याच्या लग्नाचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले तेव्हा, सर्वांनाच मोठा आश्चर्याचा धक्का बसला. आधी सर्वांना वाटले त्याचे अरेंज मॅरेज असेल, पण नंतर समजले की दत्तू आणि यांचे लव्ह मॅरेज आहे.

तेव्हापासून दत्तूच्या चाहत्यांना कायमच उत्सुकता होती ती म्हणजे दत्तूची लव्हस्टोरी जाणून घेण्याची. कारण दत्तू हा अभिनेता आहे तर स्वाती ही स्त्रीरोग तज्ञ म्हणजेच डॉक्टर आहे. मग त्यांचं नेमकं जुळलं कसं, त्याचीच ही भन्नाट स्टोरी आज जाणून घेऊया..

(maharashtrachi hasya atra fame actor dattu more love story with wife swati ghunage)

maharashtrachi hasya atra fame actor dattu more love story with wife swati ghunage
Gitanjali Aiyar Passed Away: दूरदर्शनच्या लोकप्रिय न्यूज अँकर गीतांजली अय्यर यांचे निधन..

दत्तूच्या बायकोचं नाव आहे, स्वाती घुनागे.. नुकतंच दोघांनी लग्न करून आपल्या नव्या संसाराची सुरुवात केली आहे. स्वाती मुळची पुण्याची असून ती डॉक्टर आहे, विशेष म्हणजे तिचे स्वतःचे क्लिनिक देखील आहे. त्यात दत्तू मुंबईचा, मग त्यांचं जुळलं कसं ते पाहूया..

या खास लव्हस्टोरी बद्दल एका मुलाखतीत दत्तू म्हणाला, " आम्हाला एकमेकांवर प्रेम कसं,कुठे कधी झालं हेचकळलं नाही. कारण आम्ही 4-5 वर्षांपूर्वी एका कॉमन मित्राच्या मार्फत पुण्यामध्ये भेटलो होतो. जेव्हा भेटलो तेव्हा फक्त ओळख झाली. मग आम्ही फेसबुकवर कनेक्ट झालो.'

'पण दोन वर्षे आम्ही फक्त फेसबुक फ्रेंड होतो. आमच्यात काहीच बोलणं होत नव्हतं. मग एक दिवस तिने मला महाराष्ट्राची हास्यजत्रामध्ये पाहिलं आणि त्या निमित्ताने मेसेज केला. त्यानंतर आम्ही एकमेकांशी खऱ्या बोलू लागलो.'

maharashtrachi hasya atra fame actor dattu more love story with wife swati ghunage
Sharad Ponkshe: ब्राह्मण द्वेश जेवढा करता येईल तेवढा करा.. शरद पोंक्षे यांचं खुलं आव्हान..

पुढे तो म्हणाला, 'आम्ही बोलायला लागलो तेव्हा स्वातीचं नुकतंच MS पूर्ण झालं होतं. तिची अप्रेंन्डरशिप सुरू होती.  तिच्या कामाचा व्याप वाढला होता. ती सतत कामात बिझी होती.  त्यादरम्यान इकडे महाराष्ट्राची हास्यजत्रा सुरू झालं होतं मी पण शुटींगमध्ये बिझी होतो. असे असतानाही आम्ही कसे जोडलो गेलो, हे आम्हालाही कळलं नाहीम इतक्या सहज आम्ही एकत्र आलो.'

त्यांच्या लव्हस्टोरी विषयी स्वाती सांगते, 'त्यांचा तो स्वभाव मला खूप आवडला होता. एक संसारी माणूस कसा असतो तसे ते आहेत. मी आणि माझं काम बरं असं त्यांचं असतं. आम्ही जेव्हा बोलायला लागलो तेव्हाही कामविषयीच बोलायचो. मग नंतर थोडं एकमेकांच्या आवडी-निवडी शेअर करू लागलो. पण त्यांना डिस्टर्ब करू नये म्हणून मी माझ्या मनातील भावना त्यांना सांगितल्या नाहीत".

तर यावर दत्तू (dattu more) म्हणाला, 'मी तिला आवडायचो पण ती मला सांगत नव्हती. ती मेसेज करायची आणि डिलीट करायची. एक दोन वेळा मी तिला पकडलं.  मग मला थोडासा अंदाज आला. पुढे मग बोलणं वाढलं, ते इतकं होतं की आम्ही कितीही दमून आलो तरी एकमेकांशी बोलायचोच अगदी पहाटे 4.30 वाजले तरी आम्ही बोलत असायचो. यातूनच प्रेमाची जाणीव होत गेली आणि आम्ही एकमेकांचे झालो.'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com