Dattu More: हास्यजत्रा फेम अभिनेता दत्तू मोरे अडकला लग्नबंधनात! फोटो व्हायरल

maharashtrachi hasyajatra fame dattu more get married with swati ghugane
maharashtrachi hasyajatra fame dattu more get married with swati ghuganeEsakal
Updated on

गेल्या काही वर्षात सोनी मराठी वाहिनीवर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या मालिकेने अक्षरशः महाराष्ट्राला वेड लावले आहे. याच कार्यक्रमातील एक महत्वाचा भाग म्हणजे दत्तू मोरेने त्याच्या विनोदी शैलीने त्याने प्रेक्षकांना वेड लावले. सर्वांना खळखळून हसवणारा दत्तू मोरे हा विवाहबंधनात अडकला आहे.

२३ मे मंगळवार रोजी लग्नसोहळा पार पडला. त्याने स्वाती घुंगाने हिच्याशी लग्नगाठ बांधली आहे. त्याच्या प्रिवेडींगचे फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. त्याचे चाहते त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहे.

maharashtrachi hasyajatra fame dattu more get married with swati ghugane
Kiran Mane: बिग बॉसनंतर किरण माने पुन्हा मालिकेत झळकणार, पोस्ट करून शेयर केली माहिती

इन्स्टाग्राम ‘फ्रेम फायर स्टुडिओ' या पेजवर दोघांचे फोटो शेअर करण्यात आले आहेत. या पोस्टमध्ये दत्तूच्या प्री वेडिंगचं फोटोशूट आहे. या फोटोमध्ये दोघंही एकमेकांच्या प्रेमात हरवलेले दिसत आहे.

दोघांनीही रोमँटिक पोज दिल्या आहे. या फोटोसह दत्तूने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, “जस्ट मॅरीड”. या फोटोत ते दोघंही खुपच सुंदर दिसत आहे. त्याचे चाहते दोघांच्या फोटोवर जीव ओवाळून टाकत आहे.

maharashtrachi hasyajatra fame dattu more get married with swati ghugane
Akshay Kumar Visits Kedarnath: 'एक तरी सिनेमा हिट होऊ दे रे बाबा'! अक्षय केदारनाथ बाबाच्या चरणी

त्याच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत असून त्याच्या चाहत्यांना सुखद धक्काच दत्तूने दिला आहे. आता त्याच्या आयुष्याला नवं वळण येणार असल्यानं त्याचे चाहते त्याला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देत आहे.

'आता तु वन अँड ओन्ली राहिला नाहीस', 'अभिनंदन भावा', 'अभिनंदन दत्तू' अशा अनेक कमेंटचा वर्षाव त्याच्यावर होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com