Namrata Sambherao: आणि 'त्या' दिवशी वडीलांच्या डोळ्यात पाणी आलं, नम्रताचा भावुक अनुभव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

maharashtrachi hasyajatra fame namrata sambherao emotional post on her father birthday drj96

Namrata Sambherao: आणि 'त्या' दिवशी वडीलांच्या डोळ्यात पाणी आलं, नम्रताचा भावुक अनुभव

Namrata Sambherao Emotional Post for Father: महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम नम्रता संभेराव सोशल मीडियावर कमालीची सक्रिय असते. नम्रता अनेकदा सोशल मीडियावर तिच्या फॅमिलीविषयी अनेक फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत मनातल्या भावना व्यक्त करत असते.

नम्रता सोशल मीडियावर नुकतीच एक पोस्ट केलीय. यात तिने तिच्या वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना भावुक पोस्ट लिहिली आहे.

(maharashtrachi hasyajatra fame namrata sambherao emotional post on her father birthday)

नम्रता लिहिते., Happy birthday pappa.. तेरी लाडकी मै.. मला माहितीय आमच्या 3 भावंडांपैकी मी लाडकी आहे माझ्या पप्पांची..अस्तित्व नावाची माझी पहिली एकांकिका.

वांगणी ला झाली होती ती स्पर्धा. 16वर्षांची होते, जाताना नाटकाच्या ग्रुप बरोबर गेले, पण येताना लेक रात्री एकटी कशी येणार ह्या काळजीमुळे माझे वडील मला न्यायला आले. आणि आलोच आहे तर काय करतेय लेक, कसं करते हे सुद्धा पाहिलं त्यांनी.

नम्रता पुढे लिहिते.. "आणि तो दिवस मी कधीच विसरू शकत नाही, त्यांनी एकांकिका पाहिली, कौतुक झालेल पाहिलं, मला अभिनयासाठी प्रथम पारितोषिक मिळालं तेव्हा तेही पाहिलं.

आणि सगळ्यात मोठं बक्षीस मिळालं मला त्यादिवशी पप्पांकडून, ते म्हणजे त्यांच्या डोळ्यातलं पाणी, माझ्याबद्दलचा अभिमान, आणि अभिनयाच्या क्षेत्रात काम करण्याची परवानगी. अजून काय हवंय.

नम्रता पुढे लिहिते, "मला आठवतंय जेवढं त्याप्रमाणे "बाहुलीच हवी मला द्या मज आणुनी" ह्या हट्टानंतर जर कुठला माझा हट्ट असेल तर तो म्हणजे "अभिनयच माझी कला घ्या तुम्ही जाणुनी"

कारण पप्पाना मान्य नव्हतं हे क्षेत्र पण त्यामागे त्यांची माझ्याबद्दल वाटणारी काळजी होती. कोणीच नव्हतं ह्या क्षेत्रात माहितीतलं पण फक्त विश्वासाच्या जोरावर त्यांनी मला पाठिंबा दिला.

नम्रता शेवटी लिहिते, "नंतर जेव्हा आम्ही कधी बाहेर पडायचो अगदी कुठेही डॉक्टर कडे वगरे कि त्यांना सांगायचे माझी सगळी history , कुठली serial कुठलं award , सगळं जे मला आठवत नसे तेही सगळं सांगायचे.

पण त्यांच्या डोळ्यातला आनंद त्यांचा उत्साह बघून मन भरून यायचं. माझे पप्पा जगात भारी आहेत माझं अतोनात प्रेम आहे त्यांच्यावर.. l love u pappa" अशी पोस्ट करून नम्रताने वडिलांविषयी भावुक पोस्ट लिहिली आहे.