'बॉलीवूडला नावं ठेवतो, दुसरीकडे पानमसाल्याच्या जाहिराती करतो' महेश बाबुला झापलं|Mahesh Babu Tollywood Superstar Trolled | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mahesh babu

'बॉलीवूडला नावं ठेवतो, दुसरीकडे पानमसाल्याच्या जाहिराती करतो' महेश बाबुला झापलं

Bollywood News: बॉलीवूड विरुद्ध टॉलीवूड असा संघर्ष हा गेल्या काही दिवसांपासुन सुरु आहे. टॉलीवूडच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर केलेली विक्रमी (Box Office) कमाई बॉलीवूडच्या चाहत्यांच्या चर्चेचा विषय ठरली आहे. एकापाठोपाठ वेगवेगळे टॉलीवूडचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी होताना (Tollywood Movie) दिसत आहे. त्यातुलनेत बॉलीवूडच्या चित्रपटांना प्रेक्षकांकडून मोठा प्रतिसाद मिळालेला नाही. यात टॉलीवूडच्या काही अभिनेत्यांनी (Mahesh Babu) बॉलीवूड आणि बॉलीवूडचे अभिनेते यांच्यावर टीका केली आहे. प्रख्यात अभिनेता महेश बाबुनं आपण बॉलीवूडला परवडणारे अभिनेते नसून त्या चित्रपट इंडस्ट्रीमध्ये काम करण्यात आपल्याला काही रस नसल्याचे सांगितले होते.

महेश बाबुला बॉलीवूडच्या अनेक सेलिब्रेटींनी झापले होते. त्यात राम गोपाल वर्मा यांनी तर त्याच्यावर सडकून टीकाही केली होती. आता महेश बाबु एका वेगळ्या कारणासाठी ट्रोल झाला आहे. त्यानं पानमसाल्याची जाहिरात केल्यानं त्याला नेटकऱ्यांनी ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. एकीकडे आपण बॉलीवूडचा परवडणारे अभिनेते नाही असं सांगतो. दुसरीकडे पैशांसाठी अशा प्रकारच्या जाहिराती करतो. असं म्हणून त्याला नेटकऱ्यांनी चांगलेच सुनावले आहे. दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये मोठा प्रेक्षकवर्ग असलेला अभिनेता म्हणून महेश बाबुचं मोठं प्रस्थ आहे. त्याच्या चित्रपटांना मिळणारा प्रतिसादही लक्षणीय आहे.

महेश बाबु हा त्याच्या परखड स्वभावासाठी ओळखला जाणारा अभिनेता आहे. सध्या त्याचा मेजर नावाच्या चित्रपटाची चर्चा आहे. त्याच्या ट्रेलर लाँचिंगच्या वेळी त्यानं आपल्याला बॉलीवूडमध्ये काम करण्यात कोणत्याही प्रकारचा रस नसल्याचे सांगितले होते. त्यामुळे बॉलीवूडचे चाहते दुखावले होते. आपल्या विधानाला होणारा विरोध लक्षात घेऊन महेश बाबुनं पुन्हा प्रतिक्रिया देत आपल्याला तसं म्हणायचं नव्हतं. असं सांगितलं होतं. त्यावर राम गोपाल वर्मानं स्वताच्या चित्रपटांचे हिंदी डबिंग करायचे आणि पैसे कमावयचे. हे चांगले जमणाऱ्या महेश बाबुचा बॉलीवूडशी संबंध काय असा प्रश्नही वर्मा यांनी विचारला होता.

काही दिवसांपूर्वी बॉलीवूडमधला प्रसिद्ध अभिनेता अजय देवगणनं देखील पानमसाल्याची जाहिरात केली होती. त्यामुळे त्याला देखील नेटकऱ्यांनी जोरदार ट्रोल केले होते. पानमसाल्याच्या जाहिरात करण्यात दाक्षिणात्य अभिनेते देखील मागे नाहीत अशा प्रकारच्या प्रतिक्रिया आता नेटकरी देऊ लागले आहेत.