'माझ्या निधनानंतर माझं कुटुंब खूश होईल कारण...'; महेश भट्ट हे काय बोलून गेलेले? Mahesh Bhatt Birthdaty | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mahesh Bhatt With Family

'माझ्या निधनानंतर माझं कुटुंब खूश होईल कारण...'; महेश भट्ट हे काय बोलून गेलेले?

Mahesh Bhatt Birthday: निर्माता-दिग्दर्शक महेश भट्ट नेहमीच आपल्या खळबळजनक विधानांमुळे चर्चेत राहिलेले आहेत. कितीदातरी त्यांच्या वक्तव्यांमुळे त्यांना ट्रोल केलं गेलं आहे. आता सगळ्यांनाच माहीत आहे की महेश भट्ट यांचे कुटुंब खूप मोठे आहे. त्यांची एक्स-वाईफ किरण भट्ट या होत्या,ज्यांच्यापासून पुजा भट्ट आणि राहूल भट्ट ही दोन मुलं महेश भट्ट यांना आहेत. त्यानंतर महेश भट्ट यांनी सोनी राजदान यांच्याशी लग्न केलं होतं आणि लग्नानंतर त्यांना दोन मुली झाल्या,एक आलिया भट्ट आणि दुसरी शाहीन भट्ट. महेश भट्ट यांनी आपल्या कुटुंबाविषयी एकदा खूप शॉकिंग स्टेटमेंट दिलं होतं. त्यांनी म्हटलं होतं की त्यांचे कुटुंब त्यांना जसा हवा तसा पाठिंबा देत नाही. (Mahesh Bhatt Birthday: when Mahesh Bhatt said, his family will be happy upon his death)

हेही वाचा: द काश्मिर फाईल्सच्या 'या' रेकॉर्डला तोडूच शकत नाही रणबीरचा ब्रह्मास्त्र,जाणून घ्या..

एवढंच नाही तर महेश यांनी हे देखील म्हटलं होतं की,''जर माझं निधन झालं तर माझ्या कुटुंबासाठी मी सोन्याची खाण सोडून जाईन ज्यानं माझं कुटुंब आनंदी होईल,अर्थात थोडं मिस करतील मला ते''. महेश भट्ट यांनी हे स्टेटमेंट सिमि ग्रेवालच्या चॅट शो मध्ये केलं होतं.

महेश यांनी म्हटलं होतं की,''आमच्या कुटुंबात तुम्ही कसे वागता,राहता यावर ठरतं की तुमच्याशी कसं वागायचं. तुम्ही एक ठोस भूमिका नेहमी बजावत आलं पाहिजे अन्यथा तुम्हाला नावं ठेवली जातात. आमच्या कुटुंबात काहीसं असंच चालतं. जसं मी माझ्या भावाच्या अपेक्षा पूर्ण नाही करू शकलो तर तो मला म्हणणार की कसा वाईट भाऊ आहे हा. जर मी माझ्या कुटुंबाचं नीट पोट भरू शकत नसेन तर लगेच मला म्हणणार मला कुटुंबाचा सदस्य म्हणून जबाबदाऱ्या पाळता येत नाहीत''.

यानंतर जेव्हा महेश भट्ट यांना विचारलं गेलं होतं की,'जर उद्या तुम्ही तुमच्या कुटुंबाची आर्थिक जबाबदारी पेलू शकला नाहीत तर तुमच्या कुटुंबावर याचा काय परिणाम होईल?' त्यावर महेश भट्ट म्हणाले होते की,''मला असं वाटत नाही की त्यामुळे त्यांना काही फरक पडेल''.

हेही वाचा: MMS Video वर भोजपुरी अभिनेत्री अक्षरा सिंगने सोडलं मौन;म्हणाली,'मी रडणार नाही,कारण..'

महेश भट्ट पुढे म्हणाले होते,''तुमच्या कुटुंबाप्रती काही जबाबदाऱ्या असतात,तुम्ही काही ध्येय निश्चित केलेली असतात आणि तेच तुमच्या कुटुंबाला एकत्र बांधून ठेवते पण ते जेव्हा उरत नाही,तुम्ही त्यातनं अंग काढून घेता तेव्हा नातीही मग उरत नाहीत,ती मरतात''. ते म्हणाले होते,''जेव्हा कुटुंबप्रमुखाचे निधन होते तेव्हा घरातील लोक एकमेकांत प्राण्यांप्रमाणे भांडतात, एकमेकांच्या जीवावर उठतात हे मी पाहिलंय. जेव्हा मी मरेन तेव्हा मला माहितीय माझ्या कुटुंबात कोणी आपले वडील गेले म्हणून,कोणी पती गेला म्हणून मिस करेल मला. पण ते खूशही होतील हे समजल्यावर की मी त्यांच्यासाठी मागे सोन्याची खाण सोडून गेलोय''.

हेही वाचा: 'प्रिन्सेस'...गिरीजा प्रभूवर खिळल्या नजरा

तसं इथं आवर्जुन नमूद करावसं वाटतं की महेश भट्ट् यांच्या कुटुंबाची खास गोष्ट ही आहे की त्यांच्या दोन्ही कुटुंबात खूप चांगलं नातं आहे. पूजा भट्ट आपली सावत्र आई सोनी राजदान आणि बहिणी आलिया व शाहिन यांच्या खूप जवळ आहे. त्या सर्वांमध्ये स्ट्रॉंग बॉन्ड आहे हे अनेकदा दिसून आले आहे.

Web Title: Mahesh Bhatt Birthday When Mahesh Bhatt Said His Family Will Be Happy Upon His

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..