MMS Video वर भोजपुरी अभिनेत्री अक्षरा सिंगने सोडलं मौन;म्हणाली,'मी रडणार नाही,कारण..' Akshara Singh | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Akshara Singh, a Bhojpuri Actress Breaks on leaked MMS Video

MMS Video वर भोजपुरी अभिनेत्री अक्षरा सिंगने सोडलं मौन;म्हणाली,'मी रडणार नाही,कारण..'

Akshara Singh MMS Viral Video: भोजपुरी क्वीन आणि बिग बॉस ऑटीटी फेम म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री अक्षरा सिंग सध्या तिच्या व्हायरल MMS व्हिडीओमुळे जोरदार चर्चेत आहे. अक्षरा सिंग विषयी सध्या बातमी समोर येतेय की तिचा एक जुना MMS व्हिडीओ लीक झाला आहे. MMS लीक होण्याच्या बातमीवर आता स्वतः अक्षरानं चु्प्पी तोडत खरं काय ते सांगितलं आहे.(Akshara Singh, a Bhojpuri Actress Breaks on leaked MMS Video)

हेही वाचा: 'मराठी इंडस्ट्रीत मला...', सिंघम फेम अशोक समर्थ स्पष्टच बोलले

काही दिवसांपू्र्वी अक्षरा सिंगचा एक जुना MMS व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला. व्हिडीओ समोर आल्यानंतर लोकांनी दावा केला आहे की व्हिडीओमध्ये दिसणारी भोजपुरी अभिनेत्री अक्षरा सिंग आहे. आता अभिनेत्रीनं व्हायरल MMS व्हिडीओमागचं सत्य जगासमोर सांगितलं आहे.

हेही वाचा: 'नॅशनल क्रश' म्हटल्यावर रश्मिका पहा काय म्हणाली...

एका इंग्रजी वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत अक्षरा सिंग म्हणाली की,''ज्या कोणी ही घाणेरडी गोष्ट केली आहे, त्याची मी पर्वा करत नाही''. अक्षरा म्हणाली, तिनं व्हिडीओ देखील अजून पाहिलेला नाही. अक्षराने थेट लोकांना प्रश्न विचारत म्हटलं आहे की तुम्ही हे जाणून घ्यायचा प्रयत्न केलात का की व्हिडीओत दिसणारी मीच आहे की नाही? अभिनेत्रीनं एकदम कडक भाषेत म्हटलं आहे की,''मी रडणार नाही या गलिच्छ वागणुकीनं,कारण मला या गोष्टींमुळे काहीच फरक पडत नाही''.

हेही वाचा: 'खल्लास गर्ल' सध्या काय करते?

अक्षरा सिंगने ट्रोलर्सला उत्तर देताना म्हटलं आहे की, ''या गोष्टींमुळे मी माझा आत्मविश्वास गमावणार नाही. मी त्या मुलींसारखी नाही ज्या अशा गोष्टी घडल्यानंतर उद्धव्स्त होतात''. यादरम्यान अभिनेत्रीनं आपला एक किलर डान्सिंग व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. व्हिडीओत नेहमी प्रमाणेच ती आपल्या अदांनी घायाळ करताना दिसत आहे. सोशल मीडियावर अक्षराचे असे धमाकेदार व्हिडीओ चाहत्यांसाठी नेहमीच मेजवानी ठरत असतात. आणि याच व्हिडीओतील परफॉर्मन्सनी अक्षरा चाहत्यांचे मन जिंकताना दिसते.

अक्षरा सिंग विषयी बोलायचं झालं तर ती भोजपुरीतलं मोठं नाव आहे. तिनं खूप कष्टानं इंडस्ट्रीत आपलं नाव कमावलं आहे. ती भोजपुरीतली हायेस्ट पेड अभिनेत्री आहे. बिग बॉस ओटीटी केल्यानंतर अक्षरा सिंगचं हिंदी मालिकाविश्वातही चांगलं नाव झालं आहे.

Web Title: Akshara Singh A Bhojpuri Actress Breaks On Leaked Mms

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..