Alia Bhatt: आलियाच्या मुलीला पाहून महेश भट्टना आठवली पूजा भट्ट; म्हणाले...Mahesh Bhatt | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mahesh Bhatt is most happy person with the arrival of alia bhatt baby,reminds pooja bhatt

Alia Bhatt: आलियाच्या मुलीला पाहून महेश भट्टना आठवली पूजा भट्ट; म्हणाले...

Alia Bhatt: आलिया भट्ट आणि रणबीर कपूरने रविवारी ६ नोव्हेंबर रोजी आपल्या जीवनात एका छोट्या परीचं स्वागत केलं आहे. यामुळे सध्या कपूर कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे. यादरम्यान आता आजोबा महेश भट्ट यांनी आपल्या भावना व्यक्त करत म्हटलं आहे,''ही वेळ अनुभवताना मला माझ्या पहिल्या मुलीचा पुजा भट्टचा जन्म डोळ्यासमोर येत आहे''. एका मुलाखतीत महेश भट्ट यांचा मुलगा राहूल भट्टनं देखील कुटुंबातील सध्याच्या उत्साहाच्या वातावरणाविषयी सांगितलं. (Mahesh Bhatt is most happy person with the arrival of alia bhatt baby, reminds pooja bhatt)

हेही वाचा: Sai Tamhankar: 'त्याला पाहिलं की सईच्या डोळ्यात दिसते चमक?', क्रांती रेडकरनं उघडं केलं सईचं पितळ

लॉरेन ब्राइट उर्फ किरण भट्ट या महेश भट्ट यांच्या पहिल्या पत्नी होत्या. त्यांच्यापासून महेश भट्ट यांना दोन मुलं होती,एक पूजा भट्ट आणि दुसरा राहुल भट्ट. त्यांनतर महेश भट्ट यांनी सोनी राझदान यांच्याशी लग्नगाठ बांधली. सोनीपासून महेश भट्ट यांच्या दोन मुली-एक आलिया भट्ट तर दुसरी शाहीन भट्ट, ज्या आता पूजा भट्ट आणि राहुल भट्ट या आपल्या सावत्र भावंडांसोबत खूप छान बॉन्डिंग शेअर करतात.

हेही वाचा: Disha Patani: दिशा पटानीचा 'नवा बकरा','त्या' व्हिडीओवरनं लोकांनी केलं ट्रोल...

राहुल भट्ट अद्याप आलियाच्या मुलीला पहायला गेला नाही पण त्याला 'मामा' झाल्याचा खूप आनंद झाल्याचं त्यानं सांगितलं. आई आणि बाळाची प्रकृती उत्तम आहे ही बातमी त्यानेच मीडियासोबत शेअर केली होती. त्यानेच एका इंग्रजी वृत्तपत्राला माहिती देत म्हटलं की घरात सर्वाधिक आनंद झालाय तो महेश भट्ट यांना. त्यानेच महेश भट्ट यांच्या भावना देखील मीडियासोबत शेअर केल्या.

हेही वाचा: Subodh Bhave: हॉलीवूडची प्रशंसा सुबोधला पडली महाग; लोक म्हणू लागले, 'एवढेच प्रयत्न जर..'

राहुल म्हणाला, ''महेश भट्ट यांना घरात मुलीचा जन्म झाल्याचा गर्व आहे. आलिया बाळाला कधी जन्म देतेय याची सर्वात अधिक घाई त्यांना लागली होती. त्यांच्या तीन मुली आहेत,पुजा,शाहीन आणि आलिया. त्यामुळे त्यांच्यासाठी हे चौथं कन्या रत्न घरात जन्माला येणं ही गोष्ट अभिमानास्पद आहे. ते आलियाच्या बाळाच्या जन्माच्या क्षणाची तुलना करत आहेत,आमची मोठी बहिण पूजा भट्टच्या जन्माशी''. त्यांनी आलिया-रणबीर विषयी देखील भावना व्यक्त करत म्हटलं आहे की, ''आलिया खूप जबाबादार आई होईल. आणि रणबीर एक हॅन्डसम डॅड म्हणून ओळखला जाईल''.

हेही वाचा: Alia Bhatt: डिलीव्हरीनंतर आलिया भट्टचा 'तो' व्हिडीओ व्हायरल,लोक म्हणू लागलेयत...

आलियानं मुंबईच्या एचएन रिलायन्स हॉस्पिटलमध्ये मुलीला जन्म दिला. तिनं सोशल मीडियावरनं आपण आई झाल्याचं जाहीर केलं. तिनं पोस्ट करत लिहिलं होतं,''आणि आमच्या आयुष्यातील सगळ्यात चांगली बातमी-आमचं मुल जन्माला आलं आणि आमच्या मुलीनं आमच्या आयुष्यात मॅजिक केलं आहे. लव लव लव...''. आलिया लवकरच 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' आणि 'जी ले जरा' सिनेमात दिसणार आहे. तसंच नेटफ्लिक्सच्या 'हार्ट ऑफ स्टोन' या सिनेमाच्या माध्यमातून ती हॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहे.