
Mahesh Manjrekar : आज होणार एका महाचित्रपटाची महाघोषणा.. काय आहे विषय?
मराठी चित्रपटसृष्टीतील एक दिग्गज नाव म्हणजे दिग्दर्शक महेश मांजरेकर. 'आई', 'वास्तव' ते 'दे धक्का', 'पु. ल. देशपांडे', 'नटसम्राट' अशा त्यांच्या प्रत्येक चित्रपटाने चाहत्यांना वेड लावले. काही चित्रपटांमुळे मोठा गदारोळही झाला. ‘लालबाग परळ’, ‘वरनभात लोन्चा’ यांसारख्या चित्रपटामुळे मोठे वादंग झाले. त्यामुळे महेश मांजरेकर कोणता नवीन चित्रपट घेऊन येणार याकडे सर्वांचे लक्ष असते. आज १ मे, महाराष्ट्र दिनी ते एक महत्वाची घोषणा करणार आहेत. ही घोषणा नसून महाघोषणा असेल असे त्यांनी नुकतेच जाहीर केले आहे.
हेही वाचा: अजान भोंग्यातूनच दिली पाहिजे असंं कुठं लिहीलय का.. 'भोंगा' चित्रपटाचा खणखणीत ट्रेलर..
महेश मांजरेकर (mahesh manjrekar) यांनी आपल्या सोशल मीडिया आकाऊंटवरून एक पोस्ट शेयर केली आहे. ज्यामध्ये महाराष्ट्राचा नकाशा असलेले एक पोस्टर आहे आणि सोबत एक कॅप्शन देखील लिहिले आहे. ‘महाराष्ट्र दिन.. आपल्या महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिवस… या दिवशी नव्या कलाकृतीची घोषणा करायची तर ती महाघोषणाच असायला हवी. खात्री देतो, तशी ती असेलच. उद्या सकाळी दहा वाजता. तुमचं लक्ष असू द्या कारण, तुमची प्रतिक्रिया अत्यंत मोलाची,’ अशा शब्दात महेश यांनी आजच्या घोषणेची माहिती दिली आहे. (new marathi movie) या घोषणेमुळे प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच ताणली गेली असून नेमका काय असेल हा चित्रपट याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (mahesh manjrekar movie)
हेही वाचा: अमोल कोल्हे संतापले.. दिग्पाल लांजेकरने मागितली हात जोडून माफी
विशेष म्हणजे महेश मांजरेकरांनी शेयर केलेले पोस्टर लक्ष वेधून घेत आहे. या पोस्टरवर महाराष्ट्राचा नकाशा झळकतो आहे. शिवाय एक भगवी शाल आणि बाजूने काही धनुष्यबाण उडताना दिसत आहेत. या पोस्टरला ऐतिहासिक चित्रपटाप्रमाणे स्वरूप देण्यात आले आहे. त्यामुळे चित्रपटाचा विषय आपल्याला परिचित असण्याची दाट शक्यता आहे. हा चित्रपट हिंदुत्व, प्रभू रामचंद्र, बाळासाहेब ठाकरे, छत्रपती शिवाजी महाराज, महाराष्ट्र स्वातंत्र्याचा रणसंग्राम अशा काही विषयांवर आधारलेला असेल असा तर्क सध्या प्रेक्षकांनी लावला आहे. परंतु काही तासातच चित्रपटाचे नाव घोषित होईल.
Web Title: Mahesh Manjrekar New Movie Announcement Toady At Maharashtra
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..