'इमर्जन्सी' चित्रपटात महिमा चौधरी महत्वपूर्ण भूमिकेत.. पोस्टर रिलीज.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mahima Chaudhary to play author-activist Pupul Jayakar in Kangana Ranaut’s Emergency, see first look

'इमर्जन्सी' चित्रपटात महिमा चौधरी महत्वपूर्ण भूमिकेत.. पोस्टर रिलीज..

Emergency : बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतच्या आगामी 'एमरजन्सी' या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे, कायमच कॉँग्रेसला धारेवर धरणारी कंगना या चित्रपटात चक्क भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकरणार आहे. 'आणीबाणी' या देशातील सर्वात मोठी राजकीय घटना मोठ्या पडद्यावर आणण्याचा प्रयत्न करत आहे. या चित्रपटात कंगना केवळ अभिनयच नाही तर चित्रपटाचे दिग्दर्शन ही करणार आहे. या चित्रपटातबाबत एक मोठी घोषणा नुकतीच करण्यात आली. सांस्कृतिक चळवळीतील कार्यकर्त्या आणि लेखिका पुपुल जयकर यांचीही भूमिका या चित्रपटात असणार आहे. ही भूमिका अभिनेत्री महिमा चौधरी साकारणार आहे. (Mahima Chaudhary to play author-activist Pupul Jayakar in Kangana Ranaut’s Emergency, see first look)

कंगना राणौत इंदिरा गांधी यांची भूमिका साकरणार असल्याचे जाहीर झाले आणि तिचा पहिला लुक समोर आला. या लूकला चाहत्यांनी भरपूर प्रतिसाद दिला, त्यांनंतर काही दिवसातच अभिनेता अनुपम खेर यांचा लूक रिलीज करण्यात आला आहे. या चित्रपटात अभिनेता दिवंगत राजकारणी जयप्रकाश नारायण यांची भूमिका साकारताना दिसणार आहेत. आता भाजपनेते आणि माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची भूमिका अभिनेता श्रेयस तळपदे साकरणार आहे. आता क्रांतीकारी लेखिका पुपुल जयकर यांची एंट्री झाली आहे. ही भूमिका अभिनेत्री महिमा चौधरी साकारणार असून नुकताच त्यांचा लुक समोर आला आहे.

अभिनेत्री कंगना रणौतने हे पोस्टर शेअर करून एक सुंदर कॅप्शन दिले आहे. 'त्याकाळी घडलेल्या सर्व घटनांची एक महत्वाच्या साक्षीदार, म्हणजे आयर्न लेडी पुपुल जयकर..' असं ती म्हणते. अभिनेत्री महिमा चौधरीनेही हे पोस्टर शेअर केले आहे. 'एका दिग्गज व्यक्तीमत्वाची हि भूमिका साकारताना अत्यंत आनंद होत आहे. हि जबाबदारी माझ्यावर सोपवल्याबद्दल कंगना रणौतचे खूप आभार. तिच्या सोबत काम करणं हा एक वेगळा अनुभव आहे,' असे ती म्हणाली आहे.

महिमाच्या परदेस या चित्रपटामधील अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली होती. तसेच महिमानं धडकन, ओम जय जगदीश या हिट चित्रपटांमध्ये काम केलं. 1999 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'दिल क्या करे' या चित्रपटामुळे महिमाला विशेष लोकप्रियता मिळाली. 2016 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'डार्क चॉकले'ट चित्रपटामध्ये महिमानं प्रमुख भूमिका साकारली होती. त्यानंतर तिने मनोरंजन विश्वातून ब्रेक घेतला. आता बराच मोठा ब्रेक घेऊन ती पुन्हा चित्रपटात पदार्पण करत आहे.