गौतमी देशपांडे अपघातातून थोडक्यात बचावली

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर घडली घटना
Gautami Deshpande
Gautami DeshpandeInstagram

'माझा होशील ना' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री गौतमी देशपांडे हिने नुकताच एक महत्त्वपूर्ण अनुभव सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना सांगितला. गौतमी ही मूळची पुण्याची असून शूटिंगनिमित्त ती मुंबईला येते. या प्रवासादरम्यान मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर तिच्या गाडीचा मोठा अपघात होणार होता. पण त्यातून ती थोडक्यात वाचली असून ही घटना तिने व्हिडीओद्वारे चाहत्यांना सांगितली. त्याचप्रमाणे ती सुखरुप असल्याचीही माहिती तिने दिली.

गौतमीने या व्हिडीओत सांगितले की, "मी पुण्याहून मुंबईला शूटिंगसाठी येत होते. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून येत असताना खोपोलीच्या अलीकडे घाटात असताना अचानकपणे माझी गाडी स्लिप होऊ लागली. सुदैवाने मी धिम्या गतीने गाडी चालवत होती, त्यामुळे नंतर ती मला डावीकडे घेता आली. पण त्याचवेळी माझ्या मागून गेलेली एक गाडी स्लिप झाली. ती गाडी पूर्ण गोल फिरून तिथेच दोनदा धडकली. त्या गाडीतील कोणालाच दुखापत झाली नाही. पण माझ्या डोळ्यांसमोर तो अपघात झाला, त्यामुळे मी खूप घाबरले होते. तिथून पुढे आल्यानंतर मी एक्स्प्रेस वेवरील नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला आणि त्यांनी मला पुढील १५ मिनिटांत फोन करून सांगितलं की डिझेल सांडल्याने गाड्या स्लिप होत होत्या. तो रस्ता व्यवस्थित केल्याची माहिती त्यांनी मला दिली. पण गाडीचा वेग कमी असल्याने माझा अपघात टळला."

हेही वाचा : ब्रेन स्ट्रोकनंतर राहुल रॉयचा कोरोनाशी सामना; कुटुंबीयसुद्धा पॉझिटिव्ह

गौतमीने एक्स्प्रेस वेच्या नियंत्रण कक्षाचे आभार मानले. गौतमीच्या या व्हिडीओनंतर तिच्या अपघाताचीही अफवा सोशल मीडियावर पसरली होती. त्यावर तिने इन्स्टा स्टोरीमध्ये पोस्ट लिहित सांगितलं, 'कृपया काळजी करू नका. माझा अपघात झाला नाही. मी सुखरुप आहे आणि इतरांना मदत व्हावी म्हणून मी माझा अनुभव सांगितला. खोटी बातमी पसरवणारे मूर्ख आहेत.'

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com