'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेत अभिनेता अद्वैत दादरकर बनलाय पिंकी

'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेत अभिनेता अद्वैत दादरकर बनलाय पिंकी

मुंबई: झी मराठीवरील माझ्या नवऱ्याची बायको ही मालिका कमालीची लोकप्रिय ठरली आहे. यातील गुरुनाथ, राधिका आणि शनाया अशा सगळ्याच व्यक्तिरेखा कमालीच्या लोकप्रिय ठरल्या आहेत. गुरुनाथला धडा आता धडा शिकविण्यात येणार आहे. आता पिंकीची एन्ट्री या मालिकेत होणार आहे आणि ही पिंकी बनली आहे अभिनेता अद्वैत दादरकर. त्यामुळे आता एकूणच कमाल आणि धमाल उडणार आहे.

आता राधिका आणि शनाया एकत्र आल्या आहेत आणि त्या गुरुनाथला धडा शिकविणार आहेत. गुरुनाथचा भांडाफोड करण्यासाठी दोघी पिंकी आणि चिंकी असे कोडवर्ड वापरीत आहेत. त्यामुळे सगळ्यांना ही पिंकी कोण असा प्रश्न पडलेला आहे. गुरुनाथ देखील ही पिंकी कोण याचा शोध घेत आहे. त्याने केडी आणि मम्माची मदतही याकरिता घेतली आहे.

आता पिंकी प्रत्यक्षात गुरुनाथसमोर अवतरणार आहे आणि ही भूमिका अद्वैत दादरकरने केली आहे. या मालिकेत त्याने सौमित्रची भूमिका साकारली आहेच आणि आता पिंकीदेखील तो साकारीत आहे. या पिंकीच्या एन्ट्रीमुळे मोठा गोंधळ आणि धमाल उडणार आहे हे नक्की. यापूर्वी अद्वैतने अनेक नाटकांमध्ये तसेच चित्रपटांमध्ये काम केले आहे. आता तो माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत काम करीत असला तरी यापूर्वी त्याने दिल दोस्ती दोबारा, तू माझा सांगाती, शुभं करोती अशा काही मालिकांमध्ये काम केले आहे.

(संपादनः पूजा विचारे)

majhya navryachi bayko advait dadarkar role pinky

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com