७०० करोड कमावल्यानंतर राजामौली म्हणतायत RRR बनवायचाच नव्हता,मला तर... S.S.Rajamouli | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

S.S.Rajamouli ('RRR' movie Director)

७०० करोड कमावल्यानंतर राजामौली म्हणतायत RRR बनवायचाच नव्हता,मला तर...

एस.एस.राजामौली(S.S.Rajamouli) दिग्दर्शित 'RRR' सिनेमाची सगळ्या जगात सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. म्हणूनच तर सिनेमाचं जगभरातलं मिळून बॉक्सऑफिस कलेक्शन ७०० करोडपर्यंत पोहोचलं आहे ते उगाच नाही काही. या सिनेमात अभिनेता मकंरद देशपांडे(Makrand Deshpande) यांची रामचरण आणि ज्युनिअर NTR या सिनेमातील मुख्य अभिनेत्यांसोबत छोटी पण तितकीच उठावदार भूमिका आहे. सिनेमाविषयी बोलताना मकरंद देशपांडे यांनी बाहुबली सारखा सिनेमा बनविणाऱ्या दिग्दर्शकासोबत आपल्याला काम करायची संधी मिळाली यासाठी आनंद व्यक्त केला आहे. याच मुलाखतीत मकरंद देशपांडे यांनी दाक्षिणात्य सिनेमे आणि कलाकार यांच्या कामाचं भरभरुन कौतूक देखील केलं. तर राजामौलींनी सिनेमाविषयी त्याला एक आतली खबर दिली होती याचाही खुलासा त्यानं केला आहे.

हेही वाचा: 'कसा आहे मेहूल?' कर्करोग झालेल्या पतीविषयी विचारताच अभिज्ञा भावे भावूक

मकरंद म्हणाला,'' RRR मधील या भूमिकेसाठी राजामौली यांच्या ऑफिसमधून विचारणा झाली अन् त्यांनी थेट विमानाचं तिकीट पाठवून बोलावून घेतलं. मी माझे केस कापले असल्यानं सुरुवातीला राजामौली यांनी मला लगेच ओळखलं नाही. पण माझ्या केसांमुळे काही अडलं नाही. मी सोबत केसांचा विग घेतला होता. त्यांच्याकडे मेकअप आर्टिस्ट तयार होता. लगेच माझी लूक टेस्ट झाली अन् मला भूमिका मिळाली. रामचरणने माझे काही सिनेमे पाहिले होते,त्याला माझं काम आवडलं होतं. त्यामुळे तो मला खास भेटायला तिकडे आला होता. दाक्षिणात्य सुपरस्टारनं असं म्हणणं माझ्यासाठी आंनददायी ठरल्याचं मकरंद देशपांडे म्हणाले''.

हेही वाचा: Oscar 2022: निर्मात्याचा खळबळजनक खुलासा,पोलिस अटक करणार होते विल स्मिथला

''थोड्या गप्पा मारुन झाल्यानंतर मला सिनेमाचं कथानक ऐकवलं गेलं. राजामौली सरांनीच मला 'RRR' सिनेमाच्या कथेविषयी नरेशन दिलं. खूप मस्त वाटत होतं त्यांच्याकडून कथा ऐकताना. ते मला म्हणाले, ''तुला माहितीय का बाहुबली नंतर मला एका छान छोट्याशा लव्हस्टोरी वर आधारित सिनेमा काढायचा होता. पण माझ्या पत्नीनं मला सांगितलं तुला जे करणं कठीण जातं ते तू कर. तुला जे सहज शक्य होतं ते नको करुस''. म्हणजे मग खरंतर RRR सारख्या कलाकृतीसाठी राजामौली यांच्या पत्नीचेच धन्यवाद मानायला हवे होते. कारण ती नसती तर कदाचित राजामौली यांनी RRR सिनेमा नाही तर एखादी लव्हस्टोरी बनवण्यात आनंद मानला असता. अन् प्रेक्षकवर्ग एका दर्जेदार कलाकृतीला,कथानकाला मुकले असते. पण ७०० करोडचा बिझनेस ज्या सिनेमानं आतापर्यंत केलाय त्या सिनेमाच्या दिग्दर्शकाला तो सिनेमा बनवायचाच नव्हता हे कळल्यावर मात्र थोडा धक्काच बसेल सर्वसामान्य प्रेक्षकाला.

Web Title: Makarand Deshpande On Rrr Ss Rajamouli Wanted To Make A Small Love Story After Baahubali But His Wife Told Him

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top