
अपघातानंतर मलायका अरोरा पहिल्यांदाच कॅमेऱ्यात कैद, म्हणाली...
bollywood news : बॉलीवूड मध्ये कायमच चर्चेत असलेले आणि आपले आयुष्य निर्भीडपणे जगासमोर ठेवणारे मलायका अरोरा (malaika arora) आणि अर्जुन कपूर (arjun kapoor) यांच्याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले असते. ते कधी एकत्र येतात, कुठे जातात अशा सर्व घडामोडी बारकाईने टिपल्या जातात. किंबहुना त्याबाबत ते दोघेही समाजमाध्यमांवर माहिती देत असतात. परंतु काही दिवसांपूर्वी एक छोटा अपघात मलायका अरोरो हिच्या गाडीला झाला. त्यामध्ये तिला किरकोळ दुखापत झाली. पण प्रसंगानंतर मलायकाने सोशल मिडीयाकडे जणू पाठच फिरवली होती.
हेही वाचा: 'बाई गं' म्हणत अमृताने केलं घायाळ..'चंद्रमुखी' चित्रपटाचे नवे गाणे..
मलायका अरोरा पुण्यातील एका फॅशन इव्हेंट मधून मुंबईकडे येताना तिच्या गाडीला अपघात झाला होता. या अपघातात ती किरकोळ जखमी झाली होती परंतु प्रसंगावधान दाखवून मनसेच्या कार्यकर्त्यांनी तिला रुग्णालयात दाखल केले होते. फार दुखापत झाली नसल्याने तिला दुसऱ्याच दिवशी सोडण्यात आले. त्यावेळी तिला रुग्णालयात आणण्यासाठी तिचा प्रियकर अर्जुन कपूर गेला होता. या प्रकाराची फार चर्चा झाली होती. त्यानंतर ते एकत्र कॅमेऱ्यापुढे आले नाहीत.

malaika arora shares selfie since accident
पण नुकताच तिने एक सेल्फी सोशल मीडियावर शेअर केला आहे. (malaika arora shares selfie since accident) यामध्ये तिने ब्लॅक कलरचा टॉप आणि डोक्यावर कॅप घातलेली दिसत आहे. तिचा हा सेल्फी सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे. हा फोटो शेअर करताना तिने ‘हिलिंग’ असे कॅप्शन दिले आहे. हीलिंग म्हणजेच ती अजूनही उपचार घेत आहे. हा फोटो पाहून मलायका आणि अर्जुन पुन्हा कधी कॅमेऱ्यापुढे येणार याची उत्सुकता चाहत्यांना आहे. मालयकाने २०१७ मध्ये अरबाज खानला घटस्फोट दिला. तेव्हापासून ती आणि अर्जुन कपूर डेट करत आहेत.
Web Title: Malaika Arora Shares New Picture Of Herself Since Accident Says Shes
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..