मलायका-अर्जुनने नववर्षात असा फोटो शेअर केली की तुम्ही म्हणाल....

Malaika Arora shares photo with Arjun Kapoor of New year celebration
Malaika Arora shares photo with Arjun Kapoor of New year celebration

बॉलिवूडमधल्या सगळ्याच कलाकारांनी थर्टी फर्स्टची पार्टी धूमधडाक्यात साजरी केली. सोशल मीडियावर या पार्टीचे फोटो पोस्ट केले. मात्र, अर्जून कपूर आणि मलायका आरोरा यांचा एक फोटो भलताच व्हायरल होतो आणि त्यावर गॉसिपही खूप होतंय. त्या दोघांचा असा कोणता फोटो आहे जो इतका व्हायरल होतोय...

मलायका आरोराने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अर्जून कपूरसोबत एक हटके फोटो टाकलाय. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी तिने हा फोटो शेअर केलाय. या फोटोत मलायका अर्जूनला किस करतीय आणि अर्जून सेल्फी काढतोय. ते दोघं नववर्षाच्या स्वागतासाठी गोव्याला गेले आहेत. मलायकाने या फोटोला 'Sun, star, light,  happiness.......2020' असे कॅप्शन दिले आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Sun,star,light,happiness.......2020

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial) on

याशिवाय तिने अजून एक फोटो शेअर केलाय ज्यात ती अर्जूनसह तिच्या फॅमिलीसोबत दिसत आहे. यात तिची आई, बहिण अमृता आरोरा दिसत आहेत.  

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Happy new year

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial) on

मलायका आरोराने पती अरबाज खान याच्याशी घटस्फोट घेतला. त्यानंतर अर्जून कपूरसोबत तिचं जुळलं. ते दोघं लग्न करणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. मलायका आणि अर्जून उघडपणे त्यांचे रिलेशन स्विकारतात, फिरतात, मजा करतात. हे सगळे क्षण ते सोशल मीडियावरही शेअर करताना दिसतात.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com