esakal | मलाईका अरोरा घेतेय 'विटॅमिन डी' थेरपी, काय आणि कशासाठी आहे ही थेरपी वाचा..
sakal

बोलून बातमी शोधा

malaika arora

मलाईकाने नुकताच एक व्हिडिओ पोस्ट केला आहे ज्यामध्ये ती विटॅमिन डी थेरपी घेताना दिसतेय. तिच्या या व्हिडिओवर तिच्या चाहत्यांनी प्रश्नांचा भडिमार केला आहे. 

मलाईका अरोरा घेतेय 'विटॅमिन डी' थेरपी, काय आणि कशासाठी आहे ही थेरपी वाचा..

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई-  अभिनेत्री मलाईका अरोरा तिच्या अप्रतिम डान्ससाठी आणि फिटनेससाठी खासकरुन ओळखली जाते. स्वतःला फिट ठेवण्यासाठी ती न चुकता वर्कआऊट करते. ४६ वर्षांची असलेल्या मलाईकाला पाहून तिचा वयाचा अंदाज कोणीही बांधू शकत नाही. वर्कआऊटसोबतंच ती हेल्दी डाएटसुद्धा फॉलो करते. आणि विशेष म्हणजे विटॅमिन डी थेरपी घेते. मलाईकाने नुकताच एक व्हिडिओ पोस्ट केला आहे ज्यामध्ये ती विटॅमिन डी थेरपी घेताना दिसतेय. तिच्या या व्हिडिओवर तिच्या चाहत्यांनी प्रश्नांचा भडिमार केला आहे. 

हे ही वाचा: नवाजुद्दीन सिद्दीकीची पत्नी आलियाने  पोटगीमध्ये ३० कोटी रुपये आणि फ्लॅट्सची केली मागणी..

अभिनेत्री मलाईका अरोराने इंस्टाग्रामवर तिचं सकाळचं रुटीन सांगणारा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ पोस्ट करताना तीने, विटॅमिन थेरपी. घरी राहा आणि सुरक्षित राहा असं कॅप्शन देखील दिलं आहे. या व्हिडिओमध्ये मलाईका सांगतेय, माझी दररोज सकाळची परंपरा, सूर्यप्रकाशाखाली उभं राहायचं आणि विटामिन डी मिळवायचं जे आपल्या शरिरासाठी खूप आवश्यक आहे. 

मलाईका अरोराच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी आपापली मतं मांडत चांगलाच प्रतिसाद दिला आहे.आत्तापर्यंत हा व्हिडिओ ३ लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे आणि सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल देखील होत आहे. 

सोशल मिडियावर मलाईका आणि अर्जुन कपूर यांच्या अफेअरची देखील मोठ्या प्रमाणावर चर्चा आहे. दोघंही अनेकदा एकमेकांसोबतचे फोटो शेअर करताना दिसतात. त्यांच्या चाहत्यांना देखील ही जोडी आवडते. लॉकडाऊनमध्ये मलाईका घरातंच आहे आणि तिचे अपडेट्स चाहत्यांसाठी ती सोशल मिडियावर अनेकदा शेअर करत असते.

काही दिवसांपूर्वीच मलाईकाने तिचा एक सेल्फी फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केला होता.या फोटोमुळे ती चांगलीच चर्चेत होती. या फोटोमध्ये ती लॉकडाऊन कधी संपणार याचा विचार करतेय असं दिसतंय.   

malaika arora told her morning routine she was taking vitamin d therapy  
 

loading image