माजिदीच्या चित्रपटात दीपिका नव्हे मालविका!

पीटीआय
मंगळवार, 14 मार्च 2017

शाहीद कपूरचा भाऊ ईशान खट्टर हाही या चित्रपटातून पदार्पण करणार आहे. त्याने मागील महिन्यापासून चित्रीकरणाला सुरवात केली आहे. 

मुंबई : बॉलिवूडमधील आघाडीची स्टार दीपिका पदुकोन हिला रंगभूमीवरील अभिनेत्री मालविका मोहानन हिने मागे टाकले आहे. तिने इराणी दिग्दर्शक माजिद माजिदी यांच्या 'बियाँड द क्लाऊड्स' या चित्रपटात भूमिका मिळवली आहे. 

दीपिका पदुकोनने या चित्रपटासाठी ऑडिशन दिली होती. यासंदर्भातील काही छायाचित्रेही ऑनलाईन प्रसिद्ध झाली होती. मात्र, चित्रपटनिर्माते आणि दीपिका यांची बोलणी फिसकटली. मालविका ही प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर के.यू. मोहनन यांची मुलगी आहे. 'बियाँड द क्लाऊड्स' चित्रपटाची कथा बहीण-भावाच्या नात्याभोवती फिरते. 

झी स्टुडिओज् आणि आयकँडी फिल्म्स या चित्रपटाची निर्मिती करणार असून, मालविका त्यात काम करीत असल्याच्या वृत्ताला त्यांच्याकडून दुजोरा देण्यात आला. 
"मालविका 'बियाँड द क्लाऊड्स'मध्ये काम करणार असल्याचे निश्चित झाले आहे. दिग्दर्शक माजिद यांनी तिची लूक टेस्ट घेतली असून, ते खूश आहेत. मालविकाने मुंबईत चित्रीकरणालाही सुरवात केली आहे. माजिदला तिच्यात ते पात्र दिसले," असे निर्मात्यांच्या प्रवक्त्यांनी सांगितले. 

शाहीद कपूरचा भाऊ ईशान खट्टर हाही या चित्रपटातून पदार्पण करणार आहे. त्याने मागील महिन्यापासून चित्रीकरणाला सुरवात केली आहे. 
 

Web Title: Malavika bags lead role in Majidi's 'Beyond The Clouds'