अभिनेत्रीचा मॉर्फ्ड अडल्ट व्हिडीओ व्हायरल; तक्रार दाखल

एका व्हिडिओच्या माध्यमातून ती बदनामी झाल्याचे तिचं म्हणणं आहे.
actress remya suresh
actress remya suresh team esakal

मुंबई - मल्याळम अभिनेत्री रिम्या सुरेश (malayalam actress remya suresh) ही अभिनेत्री आता सोशल मीडियावर (social media) चर्चेत आली आहे. याचे कारण म्हणजे तिची फेसबूकवर झालेली बदनामी. एका व्हिडिओच्या माध्यमातून ती बदनामी झाल्याचे तिचं म्हणणं आहे. ज्या व्हिडिओतून त्या अभिनेत्रीविषयक अपप्रचार झाला तो व्हिडिओ मॉर्फ करण्यात आला होता. त्या व्हिडिओमध्ये असणारी अभिनेत्री रिम्या आहे असे प्रथमदर्शनी दिसते आहे. त्याबाबत रिम्यानं देखील स्पष्टीकरण दिले आहे. आपल्याबाबत कुणी अप्रपचार करत असल्याचे तिनं म्हटलं आहे. (Malayalam actress Remya Suresh breaks down, files complaint against morphed content)

रिम्यानं झालेल्या प्रकाराबद्दल अल्लाप्पाझुआ पोलीस आणि सायबर विभागाकडे (cyber police) तक्रार देणार असल्याचे सांगितले आहे. रिम्या सुरेश आपल्या व्हिडिओमध्ये म्हणते त्या व्हिडिओमध्ये जे दाखविण्यात आले आहे ती मी नाहीये. एखादी पत्नी आपल्या पतीसमोर अग्निपरिक्षा देत असल्याचा तो व्हिडिओ आहे. आपण आतापर्यतच्या प्रवासामध्ये कुठल्याही प्रकारची तडजोड केलेली नाही.

रिम्यानं आता तिच्या सोशल मीडियावर जो व्हिडिओ शेअर केला आहे त्यात तिनं म्हटलं आहे की, मी रिम्या सुरेश. सध्या सोशल मीडियावर जो व्हिडिओ शेअर होतोय त्यात माझ्या ऐवजी दुसरे कुणीतरी आहे. त्यामाध्यमातून माझी बदनामी केल्याचा प्रयत्न होतोय. ज्यानं कुणी हे केलं आहे त्याच्याविरोधात मी कायदेशीर पाऊल उचलणार असल्याचेही रेम्यानं सांगितलं आहे.

actress remya suresh
'बिग बॉस मराठी १' विजेती मेघा धाडेनं केला नैराश्याचा सामना; सतत यायचे पॅनिक अटॅक्स
actress remya suresh
K2H2 च्या आठवणीत रमले काजोल-करण

ती जी कुणी आहे तिचे आणि माझे चेह-यावरील हावभाव सारखेच आहेत. त्यामुळे अनेक चाहत्यांना ती म्हणजे मीच आहे, असे वाटले आहे. मात्र प्रत्यक्षात तसे नाही. याची नोंद त्यांनी घ्यावी..

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com