प्रसिद्ध निर्मात्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या, अभिनेत्रीला करत होता 'ब्लॅकमेल' I Elamakkara Police | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sanal Kumar Sasidharan

पोलिसांनी सनल कुमारला तिरुअनंतपुरममधील परसाला येथून अटक केलीय.

प्रसिद्ध निर्मात्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या, अभिनेत्रीला करत होता 'ब्लॅकमेल'

पोलिसांनी काल 5 मे रोजी मल्याळम चित्रपट निर्माते सनल कुमार शशिधरनला (Sanal Kumar Sasidharan) ब्लॅकमेल प्रकरणी अटक केली होती. अभिनेत्री मंजू वारियरनं (Actress Manju Warrier) कोचीतील एलमक्कारा पोलीस ठाण्यात (Elamakkara Police Station) तक्रार केल्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आलंय. अभिनेत्रीनं निर्मात्यावर सोशल मीडियावर ब्लॅकमेल, धमकी, पाठलाग आणि बदनामी केल्याचा आरोप केलाय.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी (Police) गुरुवारी सकाळी सनल कुमारला तिरुअनंतपुरममधील (Thiruvananthapuram) परसाला येथून अटक केलीय. अटक करण्यापूर्वी निर्मात्यानं फेसबुक लाईव्ह देखील केलं होतं. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या व्हिडिओत त्यानं आपल्या जीवाला धोका असल्याबद्दल सांगितलंय.

हेही वाचा: अभिनेता सोनू सूदनं सुरू केला उसाच्या रसाचा स्टॉल; व्हिडिओ होतोय व्हायरल

सनल कुमारनं फेसबुक लाईव्ह (Facebook Live) दरम्यान सांगितलं की, 'हे लोक माझा फोन घेतील आणि माझं अपहरण करतील. हे लोक माझ्यावर हल्ला करत असून स्वतःला पोलीस म्हणवून घेत आहेत. कृपया कोणीतरी या प्रकरणात हस्तक्षेप करावा. मी माझी बहीण आणि तिच्या सासूसोबत मंदिरात गेलो असताना, ह्या लोकांनी मला मारण्याचा प्रयत्न केलाय. हे लोक मला जबरदस्तीनं घेऊन जात आहेत. माझा जीव धोक्यात आहे आणि मंजूचाही, असं त्यानं नमूद केलं होतं.

Web Title: Malayalam Filmmaker Sanal Kumar Sasidharan Arrested For Blackmailing Allegation Manju Warrier

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top