Maldive Row : यापुढे मालदीवमध्ये शुटींग नाहीच! बॉलीवूडमध्येही उमटले तीव्र पडसाद, 'FWICE' आक्रमक

मालदीवच्या नेत्यांना त्यांचे ते वक्तव्य चांगलेच महागात पडले आहे. त्यावरुन मोठा वाद झाला आहे.
Maldive Row PM Narendra Modi FWICE
Maldive Row PM Narendra Modi FWICEesakal

Maldive Row PM Narendra Modi FWICE : मालदीवच्या नेत्यांना त्यांचे ते वक्तव्य चांगलेच महागात पडले आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे लक्षद्वीपच्या दौऱ्यावर गेले असताना त्यांनी तेथील काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते. त्यावर मालदीवच्या काही नेत्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया आता त्यांच्या अंगलट आल्या आहेत.

सध्या सगळीकडे मालदीवच्या त्या प्रकरणाचे जोरदार पडसाद उमटल्याचे दिसून आले आहेत. त्यात बॉलीवूडही मागे नाही. बिग बी अमिताभ बच्चन यांच्यापासून रणवीर सिंग यांच्यापर्यत अनेक सेलिब्रेटींनी मालदीवला खडेबोल सुनावले आहे. क्रीडा जगतातून माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागनं जळजळीत पोस्ट करुन मालदीवच्या नेत्यांना धारेवर धरले होते. या सगळ्यात बॉलीवूडमधील एफड्ब्ल्यूआयसीई संस्थेनं पोस्ट केली आहे.

FWICE ने आता बॉलीवूडमधील फिल्ममेकर्स आणि सेलिब्रेटींना यापुढील काळात मालदीवमध्ये शुटींग न करण्याची विनंती केली आहे. त्याबाबतचे एक पत्रही शेयर केले आहे. भारतातही मालदीवसारख्या अनेक जागा आहेत त्या शोधून तिकडे शुटींग करण्याचे आवाहन FWICE ने केले आहे. बॉलीवूडमधील फिल्ममेकर्सनं आता मालदीवच्या विरोधात एकत्र येणार येण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.

फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने इम्प्लॉईज अर्थात FWICE ने यापुढील काळात मालदीवमध्ये शुटींग नकोच. अशी ठाम भूमिका घेतली आहे. या वरुन त्या प्रकरणाचे बॉलीवूडमध्ये देखील तीव्र पडसाद उमटल्याचे दिसून आले आहे. आपल्या देशातही अनेक मालदीवसारख्या किंबहूना त्यापेक्षा चांगल्या जागा आहेत.ती पर्यटन स्थळं शोधून त्या ठिकाणी आपल्या फिल्ममेकर्सनं चित्रिकरण करावे. अशी भूमिका FWICE ने घेतली आहे.

Maldive Row PM Narendra Modi FWICE
Ranbir Kapoor : 'अ‍ॅनिमल' च्या वादावर रणबीर कपूरनं पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया, 'तुम्हाला जर...', काय म्हणाला तो?

FWICE च्या प्रसिद्ध झालेल्या प्रेस नोटनुसार, मालदीवच्या तीन मंत्र्यांनी पीएम मोदी यांच्यावर आक्षेपार्ह शब्दांत टीका केली होती. त्यानंतर भारत आणि मालदीव यांच्यातील संबंध दुरावल्याचे दिसून आले. त्याचे पडसाद सोशल मीडियावरही उमटले. या निमित्तानं FWICE मीडियात तसेच चित्रपट क्षेत्रात काम करणाऱ्यांना यापुढील काळात मालदीवच्या विरोधात भूमिका घेण्याचे आवाहन केले आहे.

आपल्या देशाच्या पंतप्रधानांवर मालदीवच्या मंत्र्यांनी जी भूमिका व्यक्त केली त्याचा आम्ही निषेध करतो. त्याच प्रमाणे यापुढील काळात मालदीवमध्ये कोणत्याही प्रकारे बॉलीवूडमधून शुटींग होणार नाही याविषयी आमच्या क्षेत्रातील मान्यवर सेलिब्रेटींना आवाहन करण्यात आल्याचे FWICE च्या वतीनं सांगण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com