esakal | 'जी वेशभूषा केलीय त्याला साडी म्हणायचं का?'
sakal

बोलून बातमी शोधा

'जी वेशभूषा केलीय त्याला साडी म्हणायचं का?' जलेबी बाई ट्रोल

'जी वेशभूषा केलीय त्याला साडी म्हणायचं का?' जलेबी बाई ट्रोल

sakal_logo
By
युगंधर ताजणे

बॉलीवूडमध्ये bollywood आपल्या बोल्डनेसनं त्या अभिनेत्रीनं वेगळं स्थान निर्माण केलं होतं. साधारण दहा ते बारा वर्षांपूर्वी त्या अभिनेत्रीची एक हटके क्रेझ होती. ते तिच्या बोल्डनेसमुळेच. मल्लिका शेरावत mallika sherawat या अभिनेत्रीनं आपल्या नावाची वेगळी ओळख बॉलीवूडमध्ये तयार केली. आणि ती टिकवलीही. सध्या ती चित्रपटक्षेत्रापासून लांब असली तरी वेगवेगळ्या माध्यमांतून चर्चेत असल्याचे दिसून आले आहे. फोटो आणि व्हिडिओच्या माध्यमांतून ती प्रेक्षकांची संवाद साधत असते. यामुळे सोशल मीडियावर तिचा चाहतावर्गही मोठा आहे. भलेही ती मोठ्या पडद्यापासून दूर गेली असली तरी जाहिरात आणि वेगवेगळ्या रियॅलिटी शो मध्ये तिची अदा चाहत्यांचं लक्ष वेधून घेताना दिसते.

मल्लिकाचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्याची चर्चा आहे. त्या फोटोमुळे तिला ट्रोल व्हावे लागले आहे. काही वर्षांपूर्वी मल्लिकाचं जलेबी बाई नावाचं एक गाणं आलं होतं. त्या गाण्यानं तिला अमाप लोकप्रियता मिळवून दिली होती. आता त्याच गाण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. मात्र त्यात मल्लिकानं जी वेशभूषा केली आहे त्यामुळे तिला ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं आहे. मल्लिकाची ओळख तिच्या बोल्डनेसमुळे आहे. ती आता लवकरच छोट्या पडद्यावरुन कमबॅक करणार असल्याचीही चर्चा आहे. त्यासाठी तिनं हा व्हिडिओ शेयर केला आहे.

त्याची माहिती मल्लिकानं तिच्या सोशल मीडियाच्या अकाउंटवरुन दिली आहे. मल्लिकानं इंस्टावरुन एक व्हिडिओ शेयर केला आहे. त्यात ती जलेबा बाई या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. पहिल्यांदा मल्लिका त्या गाण्यामध्ये एका साध्या वेशभूषेत दिसते. त्यानंतर ती निळ्या रंगाच्या साडीमध्ये दिसून येते. मात्र त्या वेशभूषेला साडी म्हणावं का, असा प्रश्न तिला ट्रोलर्सनं विचारला आहे. मल्लिकाचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात झाला आहे. सध्या मल्लिका ही लॉस एंजेलिसमध्ये आहे. ती काही दिवसांपूर्वी भारतात आली आहे. मल्लिकानं तो व्हिडिओ शेयर करताना त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, शूट ऑन मोड....

हेही वाचा: Dabbu Ratnani Photoshoot ; पानं लावून कियराचं फोटोशूट भलतंच चर्चेत

त्याचं काय आहे की, मल्लिका ही एका कॉमेडी शोचं परिक्षक म्हणून काम करणार आहे. त्यासाठी ती भारतात परत आली आहे. जेव्हा मल्लिका तिच्या व्हॅनिटी व्हॅनमधून बाहेर आली तेव्हा काही फोटोग्राफरनं तिचे फोटो काढून ते सोशल मीडियावर व्हायरल केले आहे. मल्लिकाचा तो अंदाज तिच्या चाहत्यांना आवडला आहे. मात्र ट्रोलर्सनं तिला हैराण केल्याचेही दिसून आले आहे.

loading image
go to top