
'भारतीय पुरुषांनी मला नेहमीच...'; काय बोलून बसली मल्लिका शेरावत
मल्लिका शेरावत(Mallika Sherawat) बॉलीवूडच्या(Bollywood) बोल्ड अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाते. मल्लिका सध्या तिच्या आगामी RK/RKay या सिनेमामुळे चर्चेत आहेच त्याव्यतिरिक्त तिच्या बोल्ड वक्तव्यांमुळे देखील तिच्याकडं राहून राहून सगळयांचे लक्ष जातेय. आता आपल्या नव्या मुलाखतीत मल्लिका असं काही बोल्ड वक्तव्य केलं आहे ज्याची चांगलीच चर्चा रंगली आहे. मल्लिकाचे म्हणणे आहे की भारतीय पुरुषांकडून तिला नेहमीच प्रेम मिळाले,पण महिलांनी तिला कधीच पसंत केलं नाही.(Mallika Sherawat on being denoted as a sex symbol: Men love me in India)
हेही वाचा: Sushmita Sen ने भावाला इन्स्टाग्रामवर केलं अनफॉलो, आता राजीव सेन म्हणतोय...
मल्लिका शेरावतने आपल्या एका मुलाखतीत म्हटलं आहे की,'' सिनेमात बोल्ड सीन्स केल्यामुळे माझ्यावर नेहमीच टीका झाली''. एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत मल्लिका शेरावत म्हणाली,''मला वाटतं की माझं ग्लॅमर भारतीय पुरुषांना आवडायचं त्यावेळेस. मी 'मर्डर' सिनेमात बिकिनी घातली होती. माझ्या आधी देखील कितीतरी जणींनी बिकिनी घातली होती. पण मी बिनधास्त होते. मला टिकेची पर्वा नव्हती. मला माहित होतं मी बिकिनीत खूप छान दिसते कारण माझी फिगर बिकिनीसाठी परफेक्ट आहे''.
हेही वाचा: लंडनच्या मंडईत प्रवीण तरडेंना भेटला मराठी भाजीविक्रेता, Video मधून केलं आवाहन
मल्लिका पुढे म्हणाली,''तुम्हाला वाटतं का की बीचवर मी साडी घालावी? नाही,तिथे मी बिकिनीच घालणार, आणि मी ते क्षण खूप एन्जॉय केले. पण लोकांना खासकरुन महिलांना माझं बिकिनी घालणं पचनी पडलं नव्हतं. पण पुरुषांना माझं बिकिनी घालणं कुठेच खटकलं नव्हतं तेव्हा. भारतात पुरुषांनी मला खूप प्रेम दिलं. पण स्त्रियांनी मात्र माझ्या प्रती खूप गलिच्छ भाषा बोललेली देखील मी ऐकली आहे''.
मल्लिका आता लवकरच 'Rk/RKay' सिनेमात दिसणार आहे. अभिनेत्री सिनेमाचं भरपूर प्रमोशन करताना दिसत आहे. मल्लिका शेरावतच्या सिने करिअर विषयी बोलायचं झालं तर,तिनं २००३ मध्ये 'ख्वाहिश' सिनेमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर महेश भट्टच्या 'मर्डर' सिनेमात तर तिनं कहर केला होता. या सिनेमात इम्रान हाश्मि सोबत ती मुख्य भूमिकेत दिसली होती. हा सिनेमा सुपरहिट झाला होता. मल्लिकाला या दोन सिनेमांनी बोल्ड अभिनेत्रीची ओळख मिळवून दिली. आता पाहूया तिच्या नव्या सिनेमाला चाहत्यांचा कसा प्रतिसाद मिळतो .
Web Title: Mallika Sherawat On Being Denoted As A Sex Symbol Men Love Me In India
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..