आंबट शौकिन चाहत्याने गायिकेकडे मागितले न्यूड फोटो

वृत्तसंस्था
बुधवार, 22 मे 2019

दक्षिणेकडील लोकप्रिय गायिका चिन्मयी श्रीपदा हिच्याकडे एका आंबट शौकिन चाहत्याने न्यूड फोटोंची मागणी केली. चिन्मयीने न्यूड फोटो मागणाऱया या आंबट शौकिन चाहत्याला त्याच्याच भाषेत उत्तर दिले.

चेन्नईः दक्षिणेकडील लोकप्रिय गायिका चिन्मयी श्रीपदा हिच्याकडे एका आंबट शौकिन चाहत्याने न्यूड फोटोंची मागणी केली. चिन्मयीनेसुद्धा चाहत्याला त्याच्याच भाषेत उत्तर दिल्यामुळे त्याला पळ काढावा लागला.

इन्स्टाग्रामवर Mk_the_don नावाचे प्रोफाईल असलेल्या व्यक्तिने चिन्मयीला मेसेज करून न्यूड फोटो मागणी केली. चिन्मयीने न्यूड फोटो मागणाऱया या आंबट शौकिन चाहत्याला त्याच्याच भाषेत उत्तर देण्याचे ठरवले. तिने तिच्या न्यूड लिपस्टिकचे फोटो शेअर केले. 'थोडेसे मनोरंजन... ज्या लिपस्टिकचा कलर मानवी शरीराच्या रंगाशी मॅच करतो, त्याला न्यूड लिपस्टिक म्हणतात. न्यूड लिपस्टिकच्या कॅटेगरीत 20-30 स्किन टोनचे वेगवेगळे शेड्स येतात...,’ असे तिने लिहिले. चिन्मयीचे हे उत्तर पाहून न्यूड फोटो मागणाऱया युजरला काय करावे कळेनासे झाले. शेवटी त्याने त्याचे अकाऊंटच डिलीट करून टाकले.

चिन्मयी श्रीपदा हिनेही #MeToo मोहिमेअंतर्गत झालेले गैरवर्तन जगापुढे मांडले होते. तामिळ कवी, गीतकार आणि लेखक वैरामुत्तु यांच्यावर तिने गैरवर्तनाचे आरोप केले होते. 19 वर्षांची असताना मी माझ्या आईसोबत एका अतिशय दिग्गज व्यक्तिला भेटायला गेले होते. माझी आई माझ्यासोबत होती. पण प्रत्यक्षात मला एकटीलाच आत बोलवण्यात आले. मला फार आश्चर्य वाटले नाही. मी बेधडकपणे एकटीच खोलीत गेले. पण गेल्या-गेल्या त्या व्यक्तिने मला मिठी मारली. मी, त्याच्या तावडीतून निसटून बाहेर पडायला लागले असताना त्याने माझा फोन आणि बॅग पकडली. या घटनेनंतर अनेक दिवस मी अस्वस्थ होते. ही व्यक्ती दुसरी कुणी नसून पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित तामिळ कवी, गीतकार व लेखक वैरामुत्तु आहेत,' असे चिन्मयी श्रीपदाने ट्विटरवर लिहिले होते.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Chinmayi Sripada (@chinmayisripaada) on


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Man asks singer Chinmayi Sripada for nude pictures