महानायकाचे तब्बल 7 हजार फोटो जमवणारा ' दिव्येश'; बच्चनजींना आगळयावेगळ्या शुभेच्छा देणारा अवलिया

सकाळ ऑनलाईन टीम
Sunday, 11 October 2020

दिव्य़ेशने आपल्या आवडत्या महानायकाचे फोटो गोळा करण्याचा छंद जोपासला. गेल्या कित्येक वर्षापासून तो ते काम करत आहे. सतत अमिताभ यांचा ध्यास घेतलेल्या दिव्येशने अमिताभ यांच्या जमवलेल्या छायाचित्रांचा आकडा आल्यास आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. 

मुंबई- प्रत्येक कलाकाराचे चाहते हे असतातच. मात्र बॉलीवूडच्या महानायकाला चाहत्यांच्या मिळणा-या प्रेमाची बात काही औरच आहे. त्यांना भेटण्यासाठी हजारो मैलाचा प्रवास करणारे आहेत. त्यांच्याबरोबर एक फोटो काढण्यासाठी कित्येक तास वाट बघणा-यांची संख्या काही कमी नाही. देशाच्या कानाकोप-यात शहेनशहा अमिताभ बच्चन यांचे असंख्य चाहते आहेत. भारताबाहेरही त्यांचा फॉलोअर्स प्रचंड आहे. मात्र त्यांचा डाय हार्ट फॅन असणा-या दिव्येशने आपल्या आवडत्या अभिनेत्याला अनोखी भेट दिली आहे.

शतकातला महानायक असलेल्या अमिताभ यांच्यावर जीवापाड प्रेम करणा-यांना ते तितकेच प्रेमाची वागणूक देतात. त्याच्यासाठी थोडा का होईना वेळ राखून ठेवत बच्चनजी आपल्या चाहत्यांची आस्थेने विचारपूसही करतात. यासगळ्यात विशेष बाब म्हणजे त्यांच्या एकदम 'स्पेशल' अशा चाहत्यांची भेट घेऊन त्यांनी दिलेल्या आगळ्या वेगळ्या भेटीचा स्वीकार करुन त्या चाहत्यासोबत छायाचित्र काढतात. दिव्य़ेशने आपल्या आवडत्या महानायकाचे फोटो गोळा करण्याचा छंद जोपासला. गेल्या कित्येक वर्षापासून तो ते काम करत आहे.सतत अमिताभ यांचा ध्यास घेतलेल्या दिव्येशने अमिताभ यांच्या जमवलेल्या छायाचित्रांचा आकडा आल्यास आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. 

आज भी वो जहॉ खडे होते है लाईन वहॉ से शुरु होती है ; बॉलीवूडचा महानायक युवकांसाठी प्रेरणास्थान

दिव्येश 11 ऑक्टोबरला नेहमीप्रमाणे अमितजी यांना शुभेच्छा देण्यासाठी जातो. मुळचा सुरत येथे राहत असलेल्या दिव्येशने साधारण 1999 पासून अमितजी यांची छायाचित्रे जमवण्यास सुरुवात केली. ते अजूनपर्यत चालूच आहे. दिव्येशनं तब्बल 7 हजार फोटो जमवले आहेत. यात जुने चित्रपट मासिके, वृत्तपत्रातील कात्रणे प्रामुख्याने याचा समावेश आहे. त्याला आतापर्यत बच्चनजींना 10 वेळा भेटण्याची संधी मिळाली आहे. या वाढदिवसाला त्याने 11 रोपटी महानायकाला पाठविली आहेत. एका वृत्तपत्राला दिव्येशने मुलाखत दिली आहे. त्यात तो म्हणतो, मी पहिल्य़ापासूनच अमितजींचा मोठा चाहता आहे. ते माझे अतिशय आवडते अभिनेते आहेत. त्यांच्य़ाविषयी एक महत्वाची गोष्ट सांगायची झाल्यास ती म्हणजे ते आपल्या चाहत्यांना मोठ्या सन्मानाने वागवतात.

मला आठवते, की मला माझा वाढदिवस हा त्यांच्या बरोबर साजरा करण्याची फार इच्छा होती. त्याला अमितजी हो म्हटले होते. मात्र त्यांच्या प्रचंड अशा व्यस्त वेळापत्रकामुळे त्यांना येता आले नाही. मात्र त्यांना ही गोष्ट माहिती होती. पुढे काही महिन्यानंतर मला त्यांच्या ऑफिसमधून फोन आला. अमितजींना त्यांच्या कुटूंबासमवेत माझा जन्मदिवस साजरा करायचा होता. हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा क्षण असल्याची भावपूर्ण आठवण दिव्येशने सांगितली.

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A man he has been collecting photos of actor Amitabh Bachchan