आज भी वो जहॉ खडे होते है लाईन वहॉ से शुरु होती है ; बॉलीवूडचा महानायक युवकांसाठी प्रेरणास्थान 

Veteran bollywood  actor big b Amitabh Bachchan turns 78 on Sunday
Veteran bollywood actor big b Amitabh Bachchan turns 78 on Sunday
Updated on

मुंबई - वेगवेगळी स्वप्ने उराशी घेऊन ती सत्यात उतरण्यासाठी हजारो तरुण मायापूरी मुंबईची वाट धरतात. अर्थात त्यासगळ्यांच्या वाट्याला यश येते असे नाहीच. असाच एक तरुण अभिनेता होण्य़ाच्या प्रेरणेने मुंबईत आला. त्यालाही इतकं सहजासहजी मिळालं नाही. संघर्ष करावा लागला, झगडावे लागले, एवढा सडपातळ, 'लंबू टांग' वाला त्यावेळच्या दिग्दर्शकांना हिरो म्हणून खटकायचा. हा माणूस कसा काय हिरो होणार असा प्रश्न त्यांना पडला होता. मात्र नियतीच्या मनात जे होतं ते आज सर्वासमोर आहे. आज भी वो जहॉ खडे होते है लाईन वहॉ से शुरु होती है. अशीच परिस्थिती आहे.

बॉलीवूडचे महानायक शहेनशहा अमिताभ बच्चन यांच्या बंगल्याबाहेर चाहत्यांची नेहमीच गर्दी असते. त्यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने चाहत्यांची ती रांग भलीमोठी लांबलेली असते. काही करुन एकदा आपल्या आवडीच्या अभिनेत्याची एखादी छबी दिसावी यासाठी त्या चाहत्याचा जीवाचा आटापिटा सुरुच असतो.अमिताभजीही त्या शुभेच्छांचा प्रेमपूर्वक स्वीकार करुन चाहत्यांना मनपूर्वक धन्यवाद देतात. 11 ऑक्टोबर 1942 मध्ये उत्तर प्रदेशच्या अलाहाबादमध्ये बिग बी यांचा जन्म झाला. जन्मापूर्वी त्यांचे नाव इन्कलाब श्रीवास्तव असे होते.

पुढे हे नाव बदलून अमिताभ असं ठेवण्यात आलं.वयाची 78 वर्षे पूर्ण करणारे अमिताभ विशेषत; तरुणांसाठी प्रेरणास्थान आहे. या वयातही ते 14 ते 15 तास काम करत आहेत. 1970 च्या दशकाच्या सुरुवातीलाच भारतीय चित्रपटातील अॅग्री यंग मॅन अशी ख्याती मिळवणाऱ्या बिग बींनी काम केलेल्या चित्रपटांची 180 पेक्षा जास्त आहे. 1984 मध्ये ‘पद्मश्री’, 2001 मध्ये ‘पद्मभूषण’ आणि 2015 मध्ये ‘पद्मविभूषण’ पुरस्काराने गौरविण्यात आले. चौदा फिल्मफेअर पुरस्कारही त्यांना प्राप्त झाले आहेत.

प्रचंड उर्जा, उत्साह आणि सतत कार्यरत राहण्याचा स्वभाव असलेल्या बिग बी हे ख-या अर्थाने तरुणांसाठी उर्जास्त्रोत आहेत. सोशल मीडियावरही लक्षावधी चाहते त्यांना फॉलो करत असतात. इतकेच नव्हे तर त्यांच्या प्रत्येक गोष्टीवर चाहत्यांचे बारकाईने लक्ष असते. अमिताभ त्यांना ‘सात हिंदुस्तानी’ या चित्रपटाने पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळवून दिला. त्यानंतर ‘जंजीर’, ‘कुली’, ‘लावरिस’, ‘त्रिशूल’, ‘खून-पसीना’, ‘कालिया’, ‘अग्नीपथ’, ‘काला पथ्थर’, ‘डॉन’ या चित्रपटांमध्ये ते चमकले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com