man udu udu jhala , sharvari kulkarni , sampada kulkarni
man udu udu jhala , sharvari kulkarni , sampada kulkarni SAKAL

'मन उडू उडू झालं' मधली ही अभिनेत्री आता आईसोबत करतेय अभिनय, आईला ओळखलं का?

मालिकेत दिपू म्हणजेच हृताच्या बहिणीच्या भूमिकेत अभिनेत्री शर्वरी कुलकर्णी झळकली.

'मन उडू उडू झालं' मालिका काहीच महिन्यांपूर्वी संपली असली तरी मालिकेची क्रेझ कमी झाली नाही. मालिकेतल्या प्रत्येक व्यक्तिरेखेवर प्रेक्षकांनी प्रेम केलं.मालिकेत दिपू म्हणजेच हृताच्या बहिणीच्या भूमिकेत अभिनेत्री शर्वरी कुलकर्णी झळकली. शर्वरी आता पहिल्यांदाच आईसोबत काम करणार आहे. शर्वरीची आई संपदा जोगळेकर कुलकर्णी या सुद्धा मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहेत.

(man udu udu jhala serial actress sharvari kulkarni working with her mother in marathi natak )

man udu udu jhala , sharvari kulkarni , sampada kulkarni
'धर्मवीर' नंतर आता 'बाळासाहेबांचा राज', २३ जानेवारीला मुंबईत शुभारंभ

संपदा - शर्वरी ही आई मुलीची जोडी रंगभूमी गाजवणार आहेत. 'जन्मवारी' या मराठी नाटकात संपदा आणि शर्वरी अभिनय करत आहेत. या नाटकाचे शुभारंभाचे प्रयोग सध्या सुरू आहेत. हर्षदा बोरकर या नाटकाच्या दिग्दर्शक आहेत. तर संपदा आणि शर्वरी यांच्यासोबत अभिनेत्री शुभांगी भुजबळ काम करतेय. शुभांगीला आपण येऊ कशी तशी मी नांदायला मालिकेत अभिनय करताना पाहिलंय.

'मन उडू उडू झालं' मालिकेने काहीच महिन्यांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला. शर्वरीने साकारलेल्या शलाका या व्यक्तिरेखेला प्रेक्षकपसंती मिळाली. शर्वरीची आई संपदा जोगळेकर या सुद्धा मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहेत. संपदा यांनी अनेक मराठी सिनेमा, मालिकांमध्ये काम केलंय. संपदा यांनी मराठी रंगभूमीवर जुन्या संगीत नाटकांचे पुन्हा प्रयोग केले.

man udu udu jhala , sharvari kulkarni , sampada kulkarni
Sameer Khandekar: किती गोड! 'काहे दिया परदेस फेम' अभिनेत्याच्या मुलीचं बोरन्हाण, काय असतं ते?

संपदा या सध्या त्यांच्या पती सोबत शेतीच्या कामाकडे जास्त लक्ष देत असून त्यांनी मनोरंजन क्षेत्रापासून काहीसा ब्रेक घेतला. आता 'जन्मवारी' नाटकाच्या निमित्ताने संपदा मुलीसोबत काम करणार आहेत. या नाटकात या आई - मुलीच्या जोडीला एकत्र पाहायला त्यांचे फॅन्स उत्सुक आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com