मंगेश देसाई प्रथमच खलनायकाच्या भूमिकेत 

Mangesh Desai plays the villain in film for the first time
Mangesh Desai plays the villain in film for the first time

वैविध्यपूर्ण भूमिका साकारून अवघ्या महाराष्ट्रावर आपली छाप पाडणारे चतुरस्त्र अभिनेते मंगेश देसाई लवकरच आता एक वेगळ्या रूपात प्रेक्षकांसमोर येणार आहेत. 

आजवर त्यांनी प्रेमकथा, विनोदी, कौटुंबिक, रहस्यमय, चरित्रपट अशा विविध धाटणीच्या चित्रपटांमध्ये उत्कृष्ट अभिनय केला. मात्र आता 'जजमेंट' या चित्रपटाच्या माध्यमातून ते प्रथमच खलनायकाच्या भूमिकेत पडद्यावर झळकणार आहेत.

एका आयएएस ऑफिसरची भूमिका ते या चित्रपटात साकारत आहे. आजवर त्यांनी आपल्या भूमिकेच्या माध्यमातून समाजातील अनेक चांगली
वाईट व्यक्तिमत्वे आपल्या समोर आणली, परंतु अशा प्रकारची नकारात्मक भूमिका ते पहिल्यांदाच साकारत आहेत.

समाजातील काही नकारात्मक बाबीही त्यानिमित्ताने प्रेक्षकांसमोर येतील. माणसांमध्ये इतकी विकृती असू शकते, याचा विचार करण्यास भाग पाडणाऱ्या या भूमिकेविषयी मंगेश देसाई म्हणतात, 'खरंतर एक कलाकार म्हणून आम्ही 'स्विच ऑन, स्विच ऑफ' पटकन होतो. परंतु हा चित्रपट त्याला अपवाद आहे. ही व्यक्तिरेखा मला शुटिंगनंतरही विचार करण्यास प्रवृत्त करायची. मुळात वैयक्तिक आयुष्यात मी असा अजिबात नाही. तरीही एक अभिनेता म्हणून मी 'या' भूमिकेला माझ्याकडून पूर्णपणे न्याय देण्याचा प्रयत्न केला.'

समीर रमेश सुर्वे दिग्दर्शित आणि डॉ. प्रल्हाद खंदारे व हर्षमोहन कृष्णात्रेय निर्मित 'जजमेंट' या चित्रपटात प्रेक्षकांना थरार अनुभवायला मिळेल. हा चित्रपट 24 मे ला प्रदर्शित होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com