कंगनाचा 'मणिकर्णिका'चा लूक व्हायरल

मंगळवार, 31 ऑक्टोबर 2017

गेल्या काही दिवसांपासून कंगना रनोटची चर्चा आहे ती मणिकर्णिका या चित्रपटाच्या निमित्ताने. यात ती झाशीच्या राणीची भूमिका करते आहे. या भूमिकेसाठी तिने बरीच मेहनत घेतली आहे. तलवारबाजी, घोडेस्वारी अशा अनेक कला तिने आत्मसात केल्या. आता या चित्रपटाचं शूट सुरू आहे. ते सूरु असतानाच कंगनाचा राणी लक्ष्मीबाईंच्या भूमिकेतील लूक व्हायरल झाला आहे. 

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून कंगना रनोटची चर्चा आहे ती मणिकर्णिका या चित्रपटाच्या निमित्ताने. यात ती झाशीच्या राणीची भूमिका करते आहे. या भूमिकेसाठी तिने बरीच मेहनत घेतली आहे. तलवारबाजी, घोडेस्वारी अशा अनेक कला तिने आत्मसात केल्या. आता या चित्रपटाचं शूट सुरू आहे. ते सूरु असतानाच कंगनाचा राणी लक्ष्मीबाईंच्या भूमिकेतील लूक व्हायरल झाला आहे. 

व्हायरल झालेले हे फोटो मणिकर्णिकाच्या सेटवर क्लिक करण्यात आले आहेत. एकिकडे संजय लीला भन्साळी यांच्या पद्मावतीसाठी कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. पद्मावतीमधले लूक रिविल होऊ नयेत म्हणून विशेष काळजीही घेण्यात आली होती. इथे मात्र मणिकर्णिकामधले कंगनाचे लूक रिविल झाले आहेत. यात तिचा वेश श्रीमंती आहेच, पण लढवय्यी असल्यामुळे तिचा पेहराव विशेष अभ्यास करून बनवण्यात आला आहे. या चित्रपटात अतुल कुलकर्णी यांचीही तात्या टोपे यांची व्यक्तिरेखा आहे. हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे. 

Web Title: manikarnika kangana ranout look esakal news