Manoj Bajpayee: "राजकारणात येणार असशील तर ..." मनोजला नेटकऱ्यानं डिवचलं! त्यानेही दिले जशास तसे उत्तर

Manoj Bajpayee: मनोज लवकरच राजकारणात येणार अशी चर्चा सुरु आहे.
Manoj Bajpayee Bollywood Actor Joram Movie
Manoj Bajpayee Bollywood Actor Joram Movieesakal

Manoj Bajpayee: बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता मनोज वाजपेयी हा नेहमी त्याच्या चित्रपटामुळे चर्चेत असतो. तो त्याच्या जबरदस्त अभिनयासाठी ओळखला जातो. आपल्या दमदार अभिनयाने त्याने मनोरंजन विश्वात वेगळी ओळख निर्माण केली आहे.

तर आता तो त्याच्या जोरम चित्रपटामुळे चर्चेत आला होता. त्याचबरोबर त्याने ओटीटीवरही वर्चस्व निर्माण केलं आहे. मात्र आता मनोज वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे. मनोज लवकरच राजकारणात येणार अशी चर्चा सुरु आहे.

Manoj Bajpayee Bollywood Actor Joram Movie
Priyanka Chopra Mother : 'मुलांवर चांगले संस्कार होण्यासाठी यापुढील काळात....'! प्रियंका चोप्राच्या आईनं स्पष्टच सांगितलं

त्याच झालं असं की काही दिवसांपूर्वी मनोज बाजपेयीने RJD चे सुप्रिमो लालू यादव यांची भेट घेतली. या भेटीचे फोटो व्हायरल झाले आणि या भेटीची सोशल मिडियावर चर्चा सुरु झाली. या भेटीमुळे मनोज बाजपेयी राजकाणात येणार अशी चर्चा रंगली होती. मात्र आता मनोज बाजपेयी यांचा राजकारणात येण्याचा कोणताच विचार नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.

Manoj Bajpayee Bollywood Actor Joram Movie
Dunki Movie: शाहरुखच्या डंकीचा थेट युरोपमध्ये डंका! नवीन रेकॉर्ड केला नावावर

सोशल मीडिया मनोज बाजपेयीला एका नेटकऱ्यांने डिवचले. त्याने लिहिले, "निवडणुका येत आहे, आता मनोज बाजपेयीला समाजसेवक बनायचे आहे, लालूजींनी तिकीट देण्याचे वचन दिले आहे."

या ट्विटला मनोजने त्याच्याच भाषेत मजेशीर उत्तर दिले आहे. त्याने लिहिले, "आज कुछ है नहीं करने के लिए तुम्हारे पास तो भक से उलट दिये ! ब्कलोले बाड?" (आज काही काम नाही तुझ्याकडे करायला त्यामुळे काहीही बोलतोय..)

Manoj Bajpayee Bollywood Actor Joram Movie
Bigg Boss 17: धर्मेंद्र अन् सलमानचा 'जमाल कुडू'वर भन्नाट डान्स! बॉबी देओलही पडेल फिका; व्हिडिओ व्हायरल

तर दुसऱ्याने लिहिले की, "निवडणूक लढवण्याची कल्पना डोक्यात असेल तर तू जिंकणार हा विचार डोक्यातून काढून टाक" तर यावर उत्तर देताना मनोजने उत्तर दिले की, "अब इनको भी ठंड लग गई ! रज़ाई ओढ़ी आ घीव पी आ सूत ज़ाई ! रजिस्ट्री का काम परसों होगा अब!" (आता यांना थंडी वाजत आहे. आता तुम्ही झोपा..रजिस्ट्रीचे काम परवा होणार).

आता मनोज बाजपेयीच्या या ट्विटची सर्वत्र चर्चा होत आहे. या उत्तरासह मनोजचा राजकारणात येण्याचा कोणताही विचार नसल्याचे त्याने स्पष्ट केले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com