Priyanka Chopra Mother : 'मुलांवर चांगले संस्कार होण्यासाठी यापुढील काळात....'! प्रियंका चोप्राच्या आईनं स्पष्टच सांगितलं

प्रियंका ही अमेरिकेमध्ये तिचा पती निक जोनास याच्यासोबत राहते आहे.तिला मालती नावाची मुलगी आहे.
Priyanka Chopra mom Dr Madhu emphasized
Priyanka Chopra mom Dr Madhu emphasized esakal

Priyanka Chopra mom Dr Madhu emphasized : बॉलीवूडमध्ये आपल्या अभिनयानं नेहमीच चाहत्यांच्या पसंतीची अभिनेत्री राहिलेल्या प्रियंका चोप्रानं हॉलीवूडमध्ये देखील दमदारपणे आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. हॉलीवूडमध्ये तिच्या चाहत्यांची संख्या मोठी आहे. सध्या विदेशात स्थायिक असणाऱ्या प्रियंकाच्या आईनं कुटूंब पद्धतीवर केलेले भाष्य चर्चेत आले आहे.

प्रियंका ही अमेरिकेमध्ये तिचा पती निक जोनास याच्यासोबत राहते आहे.तिला मालती नावाची मुलगी आहे. २०१८ मध्ये तिनं निकसोबत लग्न केले होते. गेल्या काही दिवसांपासून प्रियंका आणि तिचा पती निक हे वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत आले आहे. हॉलीवूडमधील प्रतिष्ठेच्या ऑस्कर सोहळ्यामध्ये सहभागी होण्याची संधी हा दोन्ही सेलिब्रेटींना मिळाली होती. त्याची बॉलीवूडमध्ये चर्चा झाली होती.

प्रियंका चोप्राची आई मधू चोप्रा यांनी सध्या एकत्र आणि विभक्त कुटूंब पद्धतीवर केलेलं भाष्य हे नेटकऱ्यांच्या चर्चेत आले आहे. डॉक्टर मधू चोप्रा या सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणाऱ्या सेलिब्रेटी आहेत. त्यांनी काही दिवसांपूर्वी प्रियंका चोप्राचे लहानपण आणि विभक्त कुटूंब पद्धती, त्याचा मुलांवर होणारा परिणाम, संस्कार यावर मोकळेपणानं प्रतिक्रिया दिली होती.

डॉ.मधू यांचे म्हणणे आहे की, तुम्हाला जर तुमच्या मुलांवर चांगले संस्कार करायचे असेल तुम्हाला विभक्त राहून चालणार नाही. तुम्ही एकत्र कुटूंब पद्धतीचा विचार करायला हवा. ज्या घरामध्ये आई वडील, आजी आजोबा, काका-काकी एकत्र असतील तिथे मुलांच्या संगोपनाला कुठलीही अडचण येत नाही. सुसंवाद राहतो. अडचणींवर सहजासहजी मात करता येते. सध्या आपण एकल कुटूंब पद्धतीचा स्विकार करतो आहोत. जे चूकीचे आहे.

विभक्त कुटूंबपद्धतीमध्ये मुलं जी महत्वाची कौटूंबिक मुल्यांपासून लांब जातात. त्यांना अनेक गोष्टी ज्या एकत्र कुटूंब पद्धतीत शिकणं गरजेचे आहे त्या शिकायला मिळत नाही. या सगळ्याचा त्यांच्या व्यक्तिमत्वावर देखील परिणाम होतो. मी एक वर्किंग वुमन आहे. प्रियंका जेव्हा लहान होती तेव्हा मी ऑफिसला जायचे. अशावेळी घरी तिची काळजी घेण्यासाठी हक्काचं असं कुणी नव्हतं. त्यामुळे मला अनेक गोष्टी नव्यानं जाणवल्या. त्यात महत्वाची गोष्ट होती ती एकत्र कुटूंबपद्धतीची.

तुम्ही प्रियंकाचा कोणताही इंटरव्ह्यू घ्या.त्यामध्ये ती कुटूंबाचा उल्लेख नेहमीच करते. त्यात तिच्या संगोपनाचा विषय हा नेहमीच येतो. यामुळे मला कुटूंब पद्धतीचा विषय जास्त महत्वाचा वाटतो. असेही डॉ.मधू यांनी यावेळी म्हटले आहे.

Priyanka Chopra mom Dr Madhu emphasized
Animal OTT Release Date: आता रणबीरचा 'अ‍ॅनिमल' घरबसल्या पाहता येणार, कधी? कुठे? वाचा एका क्लिकवर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com