गुरमीतने लावून दिलं लग्न

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 एप्रिल 2018

चित्रपटाच्या किंवा मालिकांच्या सेटवर अनेक लोक काम करत असतात. नट- नट्यांशिवाय अनेक वर्षे काम करूनही तेथील स्पॉटबॉय किंवा इतर मदतगार मंडळींची ओळख कधीच कुणाला होत नाही. तरीही ते पूर्ण मन लावून काम करतात. नट-नट्यांना काय हवं, काय नको, ते पाहत असतात. काही कलाकार या स्पॉटदादांना आपल्या कुटुंबाप्रमाणेच मानतात. त्यातलंच एक नाव अभिनेता गुरमीत चौधरी याचं. गुरमीतबरोबर वर्षानुवर्ष काम करणारी सगळी माणसं म्हणजे त्याच्यासाठी त्याचं कुटुंबच. नुकतंच गुरमीतबरोबर काम करणाऱ्या एका स्पॉटबॉयचं लग्न होतं. पण आर्थिक चणचण असल्याचं गुरमीतच्या लक्षात आलं.

चित्रपटाच्या किंवा मालिकांच्या सेटवर अनेक लोक काम करत असतात. नट- नट्यांशिवाय अनेक वर्षे काम करूनही तेथील स्पॉटबॉय किंवा इतर मदतगार मंडळींची ओळख कधीच कुणाला होत नाही. तरीही ते पूर्ण मन लावून काम करतात. नट-नट्यांना काय हवं, काय नको, ते पाहत असतात. काही कलाकार या स्पॉटदादांना आपल्या कुटुंबाप्रमाणेच मानतात. त्यातलंच एक नाव अभिनेता गुरमीत चौधरी याचं. गुरमीतबरोबर वर्षानुवर्ष काम करणारी सगळी माणसं म्हणजे त्याच्यासाठी त्याचं कुटुंबच. नुकतंच गुरमीतबरोबर काम करणाऱ्या एका स्पॉटबॉयचं लग्न होतं. पण आर्थिक चणचण असल्याचं गुरमीतच्या लक्षात आलं. गुरमीतने लगेचच त्याच्या लग्नाचा खर्च स्वतः उचलला आणि त्याचं लग्न लावून दिलं. त्या स्पॉटबॉयचं लग्न नाशिकला होतं. पण गुरमीतला काही लग्नाला जाता आलं नाही. कारण त्या वेळी तो इंडोनेशियामध्ये होता. पण गुरमीतने त्या स्पॉटबॉयला भरभरून शुभेच्छा दिल्या. गुरमीत म्हणतो, ‘तो माझ्या कुटुंबाचाच एक भाग आहे, असं मी मानतो. मी अनेक वर्षांपासून त्याच्याबरोबर काम करतोय. मी त्याच्या भविष्यासाठी खूप शुभेच्छा देतो. मी नेहमीच त्याच्याबरोबर असेन.’

Web Title: manoranjan news gurmeet choudhary