"मादाम तुसॉं'त करण जोहर

वृत्तसंस्था
शुक्रवार, 20 एप्रिल 2018

मुंबई - बॉलिवूडमधील अनेक नामवंत कलाकारांचे मेणाचे पुतळे लंडनमधील प्रसिद्ध मादाम तुसॉं संग्रहालयात आहेत. यात लवकरच करण जोहरचाही समावेश होणार आहे. विशेष म्हणजे हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शकाचा मेणाचा पुतळा या संग्रहालयात अद्याप उभारला गेलेला नाही. करण जोहर याला हा मान मिळाला असून, "मादाम तुसॉं'मध्ये स्थान मिळविणारा तो पहिला भारतीय दिग्दर्शक ठरला आहे.

जगप्रसिद्ध संग्रहालयात पुतळा उभारण्यात येत असल्याची बातमी करणने ट्विट करून चाहत्यांना दिली आहे. 'प्रसिद्ध मादाम तुसॉं संग्रहालयात पुतळा उभारण्याचा सन्मान मिळालेला मी भारतातील पहिला चित्रपट दिग्दर्शक आहे. लंडनच्या टीमला धन्यवाद,'' असे ट्विट त्याने केले आहे. याची अधिक माहिती मिळाल्यावर मी देईन, असेही त्याने म्हटले आहे.

Web Title: manoranjan news karan johar in madam tusa