‘ओढ’ चित्रपट होणार १९ जानेवारीला प्रदर्शित

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 7 जानेवारी 2018

औरंगाबाद - मैत्रीच्या नात्याचे अनेक पैलू उलगडून दाखवणारा ‘ओढ’ हा चित्रपट १९ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सोनाली एंटरटेनमेंट हाउस आणि एस. आर. तोवर यांची निर्मिती असलेला हा चित्रपट प्रेक्षकांनी पाहावा, असे आवाहन अभिनेते मोहन जोशी यांनी शुक्रवारी (ता. पाच) येथे पत्रपरिषदेत केले.

अभिनेते मोहन जोशी, भाऊ कदम, भारत गणेशपुरे, शशिकांत केरकर, जयवंत भालेकर, राहुल चिटनाळे, आदित्य आळणे, सचिन चौबे, शीतल गायकवाड, तेजस्विनी खताळ, मृणाल कुलकर्णी या कलाकारांसोबत गणेश तोवर आणि उल्का गुप्ता ही नवी जोडी या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. 

संजाली रोडे, कौतुक शिरोडकर, अभय इनामदार, कुकू प्रभास यांनी लिहिलेली, प्रवीण कुवर यांनी संगीतबद्ध केलेली चार वेगवेगळ्या जॉनरची गाणी आदर्श शिंदे, वैशाली माडे, स्वप्नील बांदोडकर, नेहा राजपाल, रोहित राऊत, आनंदी जोशी व जावेद अली यांनी गायली आहेत. कथा व पटकथा दिनेश सिंग ठाकूर यांनी लिहिली असून, त्यांनीच गणेश कदम आणि दर्शन सराग यांच्यासोबत संवादलेखन केले आहे. छायांकन रविकांत रेड्डी, संकलन समीर शेख, वेशभूषा सुनीता घोरावत, रंगभूषा प्रदीप दादा, बंडू धूळप, तर कलादिग्दर्शन आरीफ खान यांचे आहे.

Web Title: manoranjan news odh movie release at 19th january