स्पृहा बनली जलमित्र

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 एप्रिल 2018

अभिनेत्री स्पृहा जोशी आपल्याला अभिनय आणि कविता या दोन्ही गोष्टींसाठी सुपरिचित आहे. ती फक्त कवितांमधूनच संवेदनशील आहे असे नाही, तर समाजाचे आपण काही देणे लागतो याचीही तिला जाणीव आहे. राज्याचा पाणी प्रश्‍न गंभीर बनला आहे. यावर लढण्यासाठी पाणी फाउंडेशन दोन वर्षांपासून प्रयत्न करत आहे. दुष्काळाशी दोन हात करणाऱ्या लोकांना आपणही साथ दिली पाहिजे, या भावनेतून स्पृहा यंदा या मोहिमेत ‘जलमित्र’ म्हणून सहभागी झाली आहे.

याबद्दल स्पृहा म्हणाली, डॉ. अविनाश पोळ आणि सत्यजित भटकळ यांच्या कामात आपणही सहभागी व्हावे, असे मला दोन वर्षांपूर्वी वाटले होते. त्यासाठी मी बैठकीलाही गेले होते. त्या वेळी काही कारणांनी मला शक्‍य झाले नाही; मात्र यंदा पाणी फाउंडेशनचे ट्‌विट बघितले आणि लगेच ‘जलमित्र’चा फॉर्म ऑनलाइन साइन केला. रोजच्या आपल्या जगण्यातून वेगळे करण्याची संधी यानिमित्ताने मला मिळाली आहे. याकामातूनच कदाचित मला नवी दिशा मिळेल.’’

Web Title: manoranjan news spruha joshi