आमीरसोबत काम करण्याची इच्छा - मानुषी

आमीरसोबत काम करण्याची इच्छा - मानुषी
मुंबई - मिस वर्ल्डचा किताब 17 वर्षांनी भारतात आणणाऱ्या मानुषीला मिस्टर परफेक्‍शनिस्ट आमीर खानबरोबर काम करायचे आहे. आपल्याला आमीरसोबत काम करण्याची इच्छा असल्याचे तिने सोमवारी (ता. 27) येथे सांगितले.

लोअर परेल येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये मानुषीने पत्रकार परिषद घेतली. ती म्हणाली, "आमीरचे चित्रपट काही तरी सामाजिक संदेश देणारे असतात. मनोरंजनाबरोबरच त्याच्या चित्रपटाच्या शेवटी समाजोपयोगी संदेश असतो. त्यामुळे त्याच्याबरोबर काम करायला खूपच आवडेल.' आपली आवडती अभिनेत्री प्रियांका चोप्रा असल्याचेही तिने या वेळी सांगितले.

मानुषीने मिस वर्ल्ड स्पर्धेसाठी आपले वैद्यकीय शिक्षण अर्धवट सोडले होते. आता ते पूर्ण करण्याचा मानसही व्यक्त केला. मानुषीने अनेक छोट्या- ोट्या गावांत जाऊन मासिक पाळीच्या काळात कोणती काळजी घ्यावी, याविषयी महिलांमध्ये जनजागृतीही केली आहे. तिने सुमारे पाच हजार महिलांना प्रशिक्षण दिले आहे. तसेच सॅनिटरी पॅडचे वाटपही केले आहे.

तू कशात करिअर करणार, असा प्रश्‍न मानुषीला विचारण्यात आला. बॉलीवूड किंवा ऍक्‍टिंग असे उत्तर ती देईल असे सर्वांना वाटत असतानाच "मी डॉक्‍टरकीचाच पेशा स्वीकारेन' असे सांगून तिने सर्वांचे अंदाज चुकवले.

मिस वर्ल्ड स्पर्धेतील आव्हानांविषयी ती म्हणाली, की सर्व स्पर्धक एकसारखे होते आणि सर्वांच्या भावनाही एकसारख्या होत्या. प्रत्येकाच्या भाषा वेगवेगळ्या असल्यामुळे त्यांच्याशी संवाद साधणे चॅलेंजिंग होते. सर्वांनी एकमेकांना खूप सहकार्य केले.

सामाजिक कार्य करू - मॉली
या वेळी मिस वर्ल्डच्या अध्यक्षा ज्युलिया मॉली यांनी मानुषीच्या उत्साही स्वागताबद्दल सर्वांचे आभार मानले. जगात भारतासारखे सेलिब्रेशन कोणीच करत नाही, असेही त्या म्हणाल्या. मानुषीच्या सहकार्याने भारतात सामाजिक कार्य करायला आवडेल असेही त्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com