झी 5 ओरिजीनल्सची घोषणा 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 29 मार्च 2018

मुंबई - झी 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मची मागच्या महिन्यात घोषणा झाल्यानंतर झी 5 चे सीईओ अमित गोएंका यांनी झी 5 च्या प्लॅटफॉर्मवर तामिळ, मराठी, तेलुगू, मल्याळम, हिंदी आणि बंगाली या सहा भाषांमध्ये दर महिन्याला एक नवीन "झी 5 ओरिजीनल वेबसीरिज' आणि एक शॉर्टफिल्म आणण्याची घोषणा केली आहे. एप्रिल महिन्याच्या शेवटापर्यंत झी 5 पाच वेगवेगळ्या 20 ओरिजीनल वेबसीरिज आणि शॉर्टफिल्म्स आणणार आहे. आणि फक्त भाषांमध्येच वैविध्य नाही तर या वेबसीरिजच्या कथांमध्ये आणि जॉनर्समध्येही वैविध्य असणार आहे. त्यामुळे 2019च्या शेवटापर्यंत झी 5 वर 90 पेक्षा जास्त ओरिजीनल्स दिसणार आहेत. 

"झी 5 ओरिजीनल्सची घोषणा करून आम्ही झी 5 ला एका वेगळ्याच स्तरावर घेऊन जाऊ इच्छितो. झी 5 ओरिजीनल्समधून आम्हाला लोकांना विचार करायला भाग पाडेल, त्यांचे मनोरंजन करेल पण त्याचबरोबर त्यांची मत मांडण्यास उद्युक्त करेल विचारमंथन घडेल आणि रिफ्रेश करेल असा कंटेट द्यायचा आहे. झी 5 म्हणजे आजच्या काळातील साधर्म्य साधणारी, कंटेट जे प्रेक्षक कनेक्‍ट होऊ शकतील अशी लायब्ररी बनेल. प्रेक्षकांना त्यांच्या आवडत्या भाषेत कोणतीही वेबसीरिज पाहण्याचे स्वातंत्र्य मिळणार आहे. ग्लोकल कंटेट असण्यावर झी 5 चा भर आहे.' असे झी इंटरनॅशनल आणि झी 5 ग्लोबल चे सीईओ अमित ओएंका यांनी सांगितले. 

झी 5 ने त्यांच्या 20 ओरिजीनल्सची घोषणा केली आहे. झी 5 हिंदीत "लाईफ सही है', "करेनजीत कौर', "लॉकडाऊन', "बब्बर का टब्बर', "झीरो कि.मी.', "टेबल न. 5', "द स्टोरी', "द बीग कव्हर अप', "धत्‌ तेरे की' या वेबसीरिज घेऊन येत आहे. तर "मेहमान', "तमाश्री', "सोने भी दो यारो' हे तीन लघुपट घेऊन येत आहे. मराठीत "हॉर्न ओके प्लीज', "लिफ्टमन' या वेबसीरिज आहेत. तर याव्यतिरिक्त 2 तामिळ, 2 तेलुगू, 1 मल्याळम आणि 1 बंगाली वेबसीरिज आहेत. यापैकी काही वेबसीरिज सुरू झाल्या आहेत तर काही सुरू होणार आहेत.

Web Title: manoranjan news zee5 origionals webseries